Monday, December 23, 2024
Homeराज्यबाळापूर तालुका पत्रकार संघाचे कार्य उल्लेखनिय - आ. नितिन देशमुख...

बाळापूर तालुका पत्रकार संघाचे कार्य उल्लेखनिय – आ. नितिन देशमुख…

बाळापूर – सुधीर कांबेकर

वेग वेगळ्या विचारधार असलेल्यांना एकाशृंखलेत जोडण्याचे बाळापूर पत्रकार संघाचेनिश्चितपणे कौशल्य वाखाणण्यासारखे असल्याचे उद्गार बाळापूरचे आ. नितीन देशमुख यांनी काढले. ते बाळापूर येथील श्रीराम मंगलभवनामध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थीच्या गौरव समारंभात विशेषअतिथी म्हणून बोलत होते.समारंभाच्या अध्यक्षस्थानी अ. भा.पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा होते. व्यासपीठावर माजी आ.लक्ष्मणराव तायडे, जिल्हा पत्रकारसंघाचे सरचिटणीस प्रमोद लाजूरकर,अँड, सै. नातीकोद्दीन खतीब,

जिल्हापत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मीर साहेब, माजी आ. नारायणराव गव्हाणकर, माजी आ. बळीराम सिरस्कार, सभापती सेवकराम ताथोड, संदीपदादा पाटील, मनोहरराव राहाणे, पो. नि. अनिल जुमळे, ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष रामदास वानखडे, आदी विराजमानहोते. बाळशास्त्री जांभेकर यांचेप्रतिमेचे पूज़न करून कार्यक्रमाचीसुरूवात झाली. सिध्दार्थ शर्मा, माजी आ. नारायणराव गव्हाणकर, बळीराम सिरस्कार, ॲड, नातीकोद्वीन खतीब,लक्ष्मणराव तायडे, बाजार समिती सभापती सेवकराम ताथोड आदींनीविचार व्यक्तकेले,

यावेळी १० वी १२वी मधील आरती रौंदळे, गौरी काळे,वैष्णवी वाघ, राहेरीस जवेरीया, शेखहुजेक शे. महेमूद, अफजीना आन्वश,पल्लवी घोगे, दिव्या गाडे, खुशी लहूकार, निलम फराडे, विशाखा वानखड़े, पार्थ इंगळे, आनंद नावकार,जवेरीया नाजीश, सोनू भटकर, प्रगती सोनोने, वर्षा चव्हाण, श्रावणी खोडके, सैययद अरफीया, आयशा सिध्दीकी,अदीन सदफ, ऋतूजा थेटे, आफरीन महेमूद, नशरत फातेमा, स्वालेहा शहेबाज, नायब रहीम पटेल, सानिया अख्तरपटेल, मोहमद सिध्धीक, धनश्री बिलबिले,

ऋषीकेश दोणे आदी गुणवंत विद्यार्थांचा भेट वस्तू व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यातआला. यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे उमेश जामोदे, अमोल जामोदे, डॉ.अतिकूर रहेमान, दिपचंद चव्हाण,दिपक रोंदळे, गजानन सुरजूसे, अमोल ढोके, शाहबाज देशमुख, मोतेबर देशमुख, शिवदास जामोदे, संदीप भारसाकळे, अमोल साबळे, श्रीकांत अबूसकर,

सुधीर कांबेकर, राजेंद्रथेटे,रफत खान, काजी मेहंदी हसन, जूनेद कुरेशी, शोएबोद्दीन शेख यांनी परिश्रम घेतलेत, संचालन गणेशराव पाथ्रीकर तर आभार प्रा. प्रवीण ढोणे यांनी मानले. कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश्वर वानखडे,किशोरचंद्र गुजराथी, करणसिंह ठाकूर, रमेश लोहकरे, बंटी कानकूब्ज,प्रल्हाद गोरे, इरफान ठेकेदार, रमेशअहीर आदींसह अनेक मान्यबर उपस्थितहोते.

उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचाही गौरव

शिक्षण, शेती, उद्योग तसेच आरोग्य आदी क्षेत्रामध्ये उल्लेखनीयकार्य करणा्या वाडेगाव येथील गजानन मानकर, विठ्ठलराव माळी, नाना(नारायण) घनमोड़े, सारा मॅडमआदींचाप्रमुख अतिथीच्या हस्ते यावेळी गौरवकरण्यातआला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: