Monday, December 23, 2024
Homeकृषीपांढुणाॅ येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम पूर्ण निकृष्ट दर्ज्याचे व नियमबाह्य ४०० हेक्टर...

पांढुणाॅ येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम पूर्ण निकृष्ट दर्ज्याचे व नियमबाह्य ४०० हेक्टर शेतकऱ्यांची शेती धोक्यात…

जल संपदा विभागाचे अर्थ पूर्ण दुर्लक्षित

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यांतील पांढुणाॅ येथील जल संपदा विभागाच्या अंतर्गत कोल्हापुरी बंधारा बांधण्यात येत आहे. मात्र जल संपदा विभागाचे अर्थ पूर्ण दुर्लक्षित दूर लक्ष होत आहे. जल संपदा विभागाच्या काही अठमुडी अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांची शेती धोक्यात आली आहे.

सदर कोल्हापुरी बंधारा हा नियम बाह्य. व निकृष्ट दर्जाचा बांधण्यात येत आहे. अश्या प्रकारची तक्रार कोल्हापुरी बधर्यालगत असलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे. सदर काम हे कोणत्याही अंदाज पत्रकानुसार होत नसून. कामामध्ये पूर्ण भ्रष्टाचार करण्यात येत आहे. सदर कामामध्ये भिंतीमध्ये माल कमी लागू म्हणुन चक्क गोटे टाकण्यात येत आहेत. कमामध्ये कोणत्याही प्रकारचा लोहा सिमेंट. रेती कमी प्रमाणात वापरण्यात येत आहे.

ऐक ते दोन महिने झाले काम चालु करुण मात्र कामावर कोणत्याही प्रकारचें फलक लावण्यात आले नाही आहे. गावकऱ्यांनी सदर अंदाज पत्रकाची मागणी केळी असता त्यांना उडवा उडवी ची उत्तरे संबंधीत अधिकारी यांचा कडून देण्यात येत आहे . सदर कोल्हापुरी बंधारा शेतीचा सपाटी पासुन उंच बांधण्यात येत आहे. त्या मुळे बंधाऱ्याचे पाणी शेतामध्ये जाऊन शेतीचे नुकसान होण्याची शक्यता नाकारा येत नाही. त्या मुळे सदर बांधकाम थंबाऊन अंदाज पत्रकानु सारच काम करावे आही मागणी गावातील शेकऱ्यांनी केली आहे.

सदर कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम हे नीकृष्ट दरज्याचे चालू असून. या मुळे आमच्या जमिनी शोक्यात अली आहे. गणेश शेळके. शेतकरी

सदर कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम हे 1कोटी 80 लाख रूपयाचे करण्यात येत आहे. मात्र सदर कामावरती कोणत्याही प्रकारचे फलक लावण्यात आले नाही. व सदर कामावरती कोणत्याही प्रकारचे अधिकारी व्हीजिट देत नाही आहेत.

सदर काम हे फक्त दोन फूट खाली खोदून वरती बांधकाम चालू केले आहे. व कामामध्ये कोणत्याही प्रकारचा लोहा. वनिकृष्ट दर्जाचे सिमेंट व फ्लोरिंग करण्यात आली नाही. प्रत्येक बिम माल मधील मालाचे स्लॅब नमुने. काढणे आवश्यक आहे. मात्र सदर कमावर्ती कोणत्याही प्रकारचे स्लॅब नमूने कामावर्ती काढण्यात येत नाही आहेत.

माझ शेत हे कोल्हापुरी बंधाऱ्याला लागून असून अगोदरच नदीच्या पुरामुळे खरडून गेले आहे. अणि आता बंधाऱ्याचे कम हे निकृष्ट पद्धतीनें करण्यात येत असून आमच्या अमच्या शेतीला धोका निर्माण झाला आहे. त्या मुळे सदर काम हे त्वरीत थांबवावे. नार्मदबाई सोनोने शेतकरी पांढुर्णा

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: