खामगाव शहरासाठी होत असलेल्या नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास जात असून जात असून आज या कामाची भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकरांनी पाहणी केली. खामगाव शहरासाठी शिरला नेमाने प्रकल्पातुन होत असलेल्या नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
आज आ अँड आकाश फुंडकर यांनी आवार नजीक पाईप जोडणी कामाची पाहणी केली. यावेळी आ अँड फुंडकर यांनी उर्वरित काम युद्धस्तरावर करून संपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे आदेश संबंधित कंत्राटदाराला दिले. लवकरच या योजनेचे माध्यमातून शहरवासीयांना पाणी मिळेल अशी आशा यावेळी आ अँड फुंडकरांनी व्यक्त केली आहे. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी उपस्थित होते.