सांगली – ज्योती मोरे
सहा डिसेंबरला आयोध्येतून नवी मोहीम सुरू होण्याची शक्यता वंचित बहुजन चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज सांगली इथं व्यक्त केली आहे. देशात यापूर्वीचे फ्लॅशबॅक लवकरात लवकर वास्तवात येणार असून तीन डिसेंबरला निकाल लागल्यानंतर सहा डिसेंबरला आयोध्येतून नवीन मोहिमेस सुरुवात होईल आणि त्यातून फ्रेन्सी उभी करण्याचा प्रयत्न होणार असल्याची शक्यता वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज सांगलीतील सर्किट हाऊस मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केलीय.दरम्यान देशात वेगवेगळ्या जातींना भिडवण्याचं काम चालू असल्याचंही त्यांनी म्हंटले आहे.