Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayमहिलेने तरुणाला चप्पलने झोडपत पोलीस चौकीत नेले...जाणून घ्या तरुणाने काय केले?...पहा व्हायरल...

महिलेने तरुणाला चप्पलने झोडपत पोलीस चौकीत नेले…जाणून घ्या तरुणाने काय केले?…पहा व्हायरल Video

न्युज डेस्क – मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात एका महिलेने एका तरुणाला चप्पलने मारहाण केली. तिने त्याची कॉलर पकडून पोलीस चौकीत नेले आणि त्याला चांगला चोप दिला. तो आपली छेड काढत असल्याचा आरोप महिलेने केला, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

बुरहानपूर जिल्हा रुग्णालयात ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आहे. हा तरुण हॉस्पिटलच्या बाहेर उभा होता, ती महिला तिथून जात असताना तरुण काहीतरी बोलला. महिलेला राग आला आणि तिने तरुणाशी वाद घालण्यास सुरुवात केली. संतापलेल्या महिलेने चप्पल काढून तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनास्थळी अनेक लोक जमा झाले. महिलेने सांगितले की तो छेड काढत होता मग जमावाने तरुणालाही बेदम मारहाण केली.

महिलेने तरुणाला मारहाण सुरूच ठेवली. तिने त्याची कॉलर पकडली आणि त्याला पोलिसांकडे घेऊन जाऊ लागली. तरुणाला पोलीस स्टेशन ला नेत असताना चपलाचा मार सुरूच होता. यादरम्यान कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला, जो व्हायरल होत आहे. तो आपली छेड काढत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. मात्र तो तरुण वारंवार सांगत होता की, ती माझ्या गावातील महिला असून तिला काही काम आहे का, असे विचारत होतो.

महिला पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर पोलिसांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस कर्मचाऱ्यासमोर महिलेने तरुणावर चप्पलचा वर्षाव केला. रुग्णालय चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी दोघांकडून माहिती घेतली. तो मला काहीतरी बोलला आहे, असे ती महिला वारंवार सांगत होती. रुग्णालयात बराच वेळ हा गोंधळ सुरू होता.

Video – सौजन्य अमर उजाला

बुरहानपूर जिल्हा रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक प्रमुख रवी सिसोदिया यांनी सांगितले की, युवक महिलांची छेड काढत होता. महिलेने तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: