नरेंद्र सोनारकर
बल्लारपूर जिल्ह्यातील मोठी आर्थिक उलाढाल असलेला बल्लारपुर शहरातील रविवारी भरणारा आठवडी बाजार १३ ऑक्टोबर २०२४ व दैनंदिन बाजार बंद असणार आहे.
रविवार १३ ऑक्टोबर ला बल्लारपूर शहरातील सर्व सार्वजनिक दुर्गादेवी, शारदादेवी चे विसर्जन असल्याने विसर्जना दरम्यान रहदारीस अडथळा निर्माण होऊन कुठली जिवित व वित्त हाणी होऊन कोणताही अनुचित्त प्रकार घडू नये,यासाठी नगर पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
त्याकरिता बल्लारपूर शहरात भरणारा आठवडी व दैनंदिन बाजार बंद ठेवण्यात येत आहे.रविवारी कोणत्याही चिल्लर व ठोक विक्रेत्यांनी आठवडी बाजार व रहदारीच्या रस्त्यावर आपली दुकाने लावू नये.
तसे आढळल्यास त्यांचेवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन नगर परिषद बल्लारपूर चे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी केले आहे