Monday, December 23, 2024
Homeराज्यसम्यक आणि वंचित युवा आघाडीचा इशारा मोर्चा संपन्न...

सम्यक आणि वंचित युवा आघाडीचा इशारा मोर्चा संपन्न…

अकोला – नोकर भरतीचे खाजगीकरण, पेपरफुटी विरुद्ध कायदा, जादा परीक्षा शुल्क, शिक्षक भरती, कंत्राटी शिक्षक, शाळा खाजगकरण व शाळा दत्तक, समुह शाळा ह्या विरोधात अकोल्यातील तरुणाईने आज एल्गार पुकारला असून सम्यक आणि वंचित युवा आघाडीच्या वतीने आज सम्यक आंदोलन प्रमुख मा. प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे नेतृत्वात शास्त्री स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय असा इशारा मोर्चा संपन्न झाला.

प्रमुख मागण्या :

१. कंत्राटी नोकर भरती शासन निर्णय तात्काळ रद्द करावा व सरकारी क्षेत्रातील खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करण्यात यावे.वाढीव फी रद्द करण्यात यावी.

२. स्पर्धा परिक्षेसाठी राजस्थानच्या धर्तीवर एकच परिक्षा शुल्क (OTR) आकारण्यात यावे.तसेच ह्या परीक्षा लोक सेवा आयोगा मार्फत घेण्यात याव्यात.

३. जि.प.शाळा बंद करण्याचा आणि समूह शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द करावा.

४. सर्व शासकिय रिक्त पदांची भरती लवकरात लवकर तातडीने करण्यात यावी.

५. राज्यसेवा व सरळसेवा पदभरती MPSC च्या मार्फत करण्या साठी आयोगाला अध्यक्ष व इतर अधिकारी मोठ्या संख्येत नियुक्त करावे.

६. पेपरफुटी संदर्भात कडक कायदा करण्यात यावा.त्यात अजामीनपात्र व राज्याचे विरुद्ध द्रोह केल्याचे कलम समाविष्ट करावे.

७. KG to PG सर्वांना मोफत शिक्षण मिळावे.शिक्षणाचे खाजगीकरण तातडीने थांबवावे.

८. केंद्र राज्य सरकारच्या विविध परिक्षांसाठी तालुका स्तरावर परिक्षाकेंद्र सुरु करावे.

९. शिक्षण हक्क कायद्यानुसार १ ली ते १० वी पर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण करून ह्या आधी शिक्षण दिलेल्या शाळांची थकित संपूर्ण रक्कम अदा करावी.

१०. प्रलंबीत शिष्यवृत्ती आणि स्वाधारचा निधी तात्काळ वितरीत करवा.तसेच महागाई
निर्देशांकानुसार त्यात वाढ करावी.

११. शासकिय वस्तीगृहातील भत्ता १५०० रु व स्टेशनरीमध्ये वाढ करावी.

१२. शिक्षक भरती, कंत्राटी शिक्षक, शाळा दत्तक देणे बाबतीत केलेले बेकायदा नियम रद्द करण्यात यावे अश्या मागण्या ह्या वेळी करण्यात आल्या. मोर्चा मध्ये ह्या वेळी युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, प्रदेश उपाध्यक्ष, प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर , प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, विभागीय महासचिव बालमुकुंद भिरड, तसेच युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, वंचित बहुजन युवा आघाडी महानगर अध्यक्ष पश्चिम आशिष मांगुळकर, महानगर अध्यक्ष पूर्व जय तायडे, कुणाल राऊत महासचिव उपस्थित होते.

संचालन एड. मिनल मेंढे तर प्रास्ताविक धीरज इंगळे जिल्हाध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन ह्यांनी केले आम्ही बेरोजगार झालो तर २०२४ ला बेरोजगार करणार असा निर्धार आंदोलकांनी केला.

मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हा वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हा महानगर पदाधिकारी सहभागी झाले होते. जिल्हा प्रशासनाने अधिकारी पाठवून मोर्चा मध्ये निवेदन स्विकारावे अशी मागणी मोर्चेकरी ह्यांनी केली होती, मात्र जिल्हा प्रशासन जुमानत नसल्याने निवेदन देणार नसल्याचा पवित्रा घेऊन पोस्टाने निवेदन पाठविण्याचा निर्णय सम्यक ने घेतला.

जिल्हा महासचिव गायत्री डहाके उपाध्यक्ष स्वरूप इंगोले, उपाध्यक्ष ऍड श्रीकांत वाहुरवाघ, उपाध्यक्ष अनिकेत शिरसाट, उपाध्यक्ष स्वरूप इंगोले, उपाध्यक्ष आदित्य बावनगडे, सह संघटक ऋषिकेश इंगळे, प्रसिध्दी प्रमुख अक्षय डोंगरे, सह प्रसिध्दी प्रमुख अंकित इंगळे, सोशल मीडिया प्रमुख प्रथमेश गोपणारायन,अंकुश धुरंदर सह मिडिया प्रमुख, सचिव राहुल खडे,

सचिव अंकित इंगळे,नागेश गवई, युवा आघाडी जिल्हा कोषाध्यक्ष दादाराव पवार, उपाध्यक्ष अँड सुबोध डोंगरे, निलेश इंगळे, नितीन वानखडे, नासरी चव्हान, संतोष गवई, अमित मोरे,आनंद खंडारे, श्रीकृष्ण देवकुनबी,आदित्य इंगळे, आशिष रायबोले, क्लासेस संचालक निखिल पतोंड सर,निखिल खांडे सर, अनिल हांडे सर, रवि बावने सर,नीलखंत सर,

गजानन वाकोड़े सर., प्रशांत पतोंड सर, शेखर इंगळे, सुजित तेलगोटे, मनोज इंगळे, आशिष सरपदे, महेश शर्मा, ओम मुरेकर, दर्शन बागडे, आदित्य गायकवाड, लखन वाकोडे, वसीम खान, राहुल अहिरे, प्रवीण खंडारे, आनंद शिरसाठ विजय बोदडे, मयूर सपकाळ,आशिष रायबोले, निशांत राठोड, उमेश लबडे, स्वप्नील वाघ , नंदकिशोर मापारी,

विकी खाडे ,सुयोग चव्हाण, आदेश इंगळे, जितेश गावंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई अढाऊ, शिक्षण सभापती मायाताई नाईक, समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, पशुसंवर्धन सभापती योगिताताई रोकडे, महिला बालकल्याण सभापती रिझवाना परविण, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे,प्रभाताई शिरसाट, पुष्पाताई इंगळे,

निलोफर शहा, वंदनाताई वासनिक,प्रतिभाताई अवचार,मंतोषताई मोहोळ,बुध्दरत्न इंगोले, राम गव्हाणकर, दीपक गवई, नितीन सपकाळ, सचिन शिराळे, प्रशिक मोरे युवा सोशल मिडिया प्रमुख.ह्यांनी कळविले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: