भंडारा – सुरेश शेंडे
तुमसर – एकाच इमारतीच्या छताखाली तालुक्यातील सर्वच मुख्य कार्यालये राहावीत आणि प्रशासकीय कामांना गती मिळावी, यासाठी तुमसर तालुकास्तरावर राज्यशासनाकडुन १४ कोटी रूपये खर्च करून तालुक्याच्या ठिकाणी जुन्या तहसिल कार्यालयाच्या परिसरात नविन प्रशासकीय इमारत तयार करण्यात आली.तालुक्यात राज्य शासनाची अनेक कार्यालये भाड्याच्या इमारतीत होते. प्रशासकीय कामांकरिता अधिकारी व नागरिकांना एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात जाण्यासाठी त्यांचा वेळ व श्रम जात होते.
अधिकाऱ्यांना सुद्धा एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात जाताना त्रास सहन करावा लागत होता म्हणून तुमसर तहसील कार्यालय परिसरात नूतन सुसज्ज प्रशासकीय इमारत बांधकाम करण्यात आले.मात्र या सुसज्ज इमारतीची साधी रंगरंगोटी करण्यात आल्याने या इमारतीच्या भिंतीचे पोपडे निघाल्याने दुर्दशा झाली आहे.
यावरून हे लक्षात येते की कोट्यावधीच्या इमारतीचे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले हे समजते.असा प्रश्न तालुक्यातील नागरीक उपस्थित करीत आहेत.निर्माणाधीन प्रशासकीय ईमारतीत पोलीस विभागाचा कार्यालय वगळता सर्वच कार्यालये या प्रशासकीय इमारतीत स्थानांतरीत आहेत.
या प्रशासकीय ईमारतीत महसुल विभागाचे, उपविभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, कृषी विभाग, पं.स कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय,आदी विभागासह अन्य कार्यालयांचा त्यात समावेश आहे.सन २०१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रशासकीय इमारतीला निधी मंजूर करण्याची प्रक्रिया पुर्णत्वास आली होती.
या नविन प्रशासकीय इमारती मुळे राज्य शासनाचे भाड्यापोटी कोट्यवधी रूपयांची बचत झाली.असून अधिकारी व नागरिकांना सुविधा झाली.विकासकामांना गती, नियोजन, अधिकाऱ्यांचे समन्वय व नागरिकांची कामे तातडीने होऊन वेळ व श्रमाची बचत होणार या दृष्टीने ही इमारत बनविण्यात आली.परंतु तालुक्यातील या नविन सुसज्ज प्रशासकीय इमारतीच्या भिंतीचे पोपडे निघाल्याने यात किती मलाई कंत्राटदाराने लाटली अशी चर्चा नागरिकांत रंगली आहे.तर सबंधित कंत्राटदारावर कारवाई होणार का याकडे सुद्धा नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तहसील कार्यालय दुर्गंधीसह घाणीचे समर्थक?
तालुक्याची वाढती व्यप्ति पाहता ग्रामीण व शहरी भागातील जनतेला, शालेय विद्यार्थ्यांना, अपंगाना, निराधार, ह्यांना तहसील कार्यलया मधे आपल्या कामासाठी यावे लागत असल्यामुळे एखाद्या महिला किवां पुरुषावर हमखास शौचालयाचा वापर करण्याची वेळ येते.
पण शौचालयात गेल्यावर जाणाऱ्या व्यक्तीला ओकाऱ्या झाल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिति तुमसर तहसील कार्यालयातील शौचालय आणि मुतारयांची झाली आहे. ह्या मधे पाण्याची सुद्धा तरतूद नाही. सर्व सामान्य जनता आपल्या कामांसाठी तहसील कार्यालयात येतात अश्या वेळेस नैसर्गिक क्रिया करण्यासाठी शौचालयात गेल्यास तेथे पाणी सुद्धा नसणे, हे बेजवाबदार पणाचेच लक्षण आहे. स्वछतेचा संदेश देणाऱ्या गाडगेबाबा यांच्या संदेशाचे काय… ? असा सवाल आता नागरीक करत आहेत.