नरखेड – अतुल दंढारे
अरविंदबाबू देशमुख महाविद्यालय भारसिंगी येथे राष्ट्रीय मतदार दिन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने उत्सव साजरात करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पवार तर प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक राजेंद्र घोरपडे उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविकांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमा अधिकारी प्रा.आशिष काटे सर यांनी कार्यक्रमाचे रूपरेषा सांगितली आणि राष्ट्रीय मतदार दिन केव्हापासून सुरू झाला याबद्दल माहिती दिली.
आपल्या मनोगतामध्ये प्रा. राजेंद्र घोरपडे सर यांनी युवकांनी राजकारणामध्ये येणे काळाची गरज आहे असे सांगितले. तसेच राष्ट्रीय मतदार दिवस दिनाची पार्श्वभूमी स्पष्ट केली राष्ट्रीय आयोगाबद्दल माहिती दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी राष्ट्रीय निवडणूक आयोगाचा इतिहास मांडला तसेच मतदार हाच देशाचा मालक आहे आणि जागृत मतदार असणे ही काळाची गरज आहे असे सांगितले.
वरील कार्यक्रमाला महाविद्यालयातील कला शाखाप्रमुख डॉक्. साधना जिसकर मॅडम डॉ. अंजली गारपुरे मॅडम प्रा. मानसी जोशी मॅडम डॉ. रामकुमार डोंगरे सर प्रा. संपत सिंगडा प्रा. भरत मडावी सर डॉ. नितीन राऊत सर प्रा. अंकिता पावडे मॅडम प्रा. अजय मंगल प्रा. भूषण कोडे सर प्रा. माहेश्वरी कोकाटे मॅडम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा. से. यो. सह कार्यक्रमाधिकारी प्रा. सुरेंद्र सिनकर सर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी डॉ. अमित गद्रे सर यांनी मानले.