Monday, December 23, 2024
Homeराज्यबिरसा मुंडा जयंती निमित्त भगवान बिरसा मुंडा व धर्मगुरू पहांदी पारी कुपार...

बिरसा मुंडा जयंती निमित्त भगवान बिरसा मुंडा व धर्मगुरू पहांदी पारी कुपार लिंगो यांच्यापुतळ्याचा अनावरण सोहळा…

रामटेक – राजु कापसे

दिनांक 4/12/2022 शनिवार रोजी मौजा सालाई (पिपरीया) तालुका रामटेक येथे बिरसा मुंडा जयंती निमित्त क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा व धर्मगुरू पहांदी पारी कुपार लिंगो यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा मा. श्री. राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या हस्ते करण्यात आला. आदिवासी व गोंडी समाजातील संस्कृतीचे दर्शन लोंकाना व्हावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. हरीशजी उईके (गों.ग.पा. अध्यक्ष, महाराष्ट्र जि. प. सदस्य नागपूर) यांनी भूषविले असून मा. श्रीमती. शांताताई कुमरे (जि. प. सदस्य नागपूर), श्री धनराज मडावी, (जिल्हा अध्यक्ष, गोंडवाना गणतंत्र पार्टी, नागपूर)श्री. चंद्रकांत कोडवते ( प. स. सदस्य), श्री. झनकलाल मरसकोल्हे,

सौ. संगीता मरसकोल्हे,श्री. दिपक परतेती, श्री. बाळकृष्ण वाडीवे, श्री. धर्मराज कोकोडे, श्री. सूर्यभान इडपाची, श्री मुकेश केने, श्री. परमेश्वर इनवाते, श्री. प्रविण ऊईके, श्री. संतलाल ऊईके, श्री राजू उईके, श्री. संतोष ऊईके, श्री. सहादेव वाढवे, श्री सुरेश मरसकोल्हे, सौ. रेखा ठाकरे, सौ. सरिता ऊईके, श्री. आकाश पंधरे व गावकरी मंडळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: