नांदेड – महेंद्र गायकवाड
दिग्गज कॉमेडीयन म्हणून ओळखले जाणारे राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या मृत्युनंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ही श्रीवास्तव यांच्या अवकाळी जाण्याने एक चांगला कलाकार गमावला असल्याचे म्हण्टले आहे.
अशोकराव चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडियावरिल पेज मध्ये राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुप्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचे अकाली निधन अतिशय दुःखद आहे. परिश्रमातून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. स्वतःच्या जीवावर प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्याचा उत्स्फूर्त कटाक्ष आणि अभिनयाने सर्वांना खळखळून हसवलं.
Raju Srivastav | कॉमेडीचा बादशहा हरपला…
छोट्या छोट्या जीवनातील घटना आणि रोज दिसणारी अनेक सामान्य पात्रांमध्ये साध्या शब्दात व्यंग शोधणे हे त्याचे उत्तम वैशिष्ट्य होते. त्यांचा ‘गजोधर भैय्या’ खूप लोकप्रिय होता. राजू श्रीवास्तव हे सुद्धा खूप चांगले माणूस होते. चव्हाण म्हणाले की, माझी त्यांच्याशी अनेक वर्षे मैत्री होती. त्यांच्या अनेक कार्यक्रमांना मी उपस्थित होतो. त्यांच्या अवकाळी जाण्याने एक चांगला कलाकार गमावला आहे. यांना भावपूर्ण श्रद्धांजली.