रामटेक – राजु कापसे
प्रभू श्री रामचंद्र ची नगरी रामटेक येथे कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने त्रिपुर चा उत्सव साजरा होत असतो. त्याच निमित्ताने रामटेकला लागून असलेले ग्रामपंचायत शितलवाडी येथे सुद्धा मागील 30 वर्षापासून श्री महारुद्र हनुमान मंदिर येथे त्रिपुर जाळून हा उत्सव साजरा केला जातो.
कार्तिक महिना लागला की रोज महिनाभर सकाळी 5:30 वाजता काकड आरती होत असते या काकड आरतीला मोठ्या उत्साहाने भाविक भक्त मंदिरात येऊन काकड आरती करत असतात. महिनाभरी काकड आरती संपल्यानंतर त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता ट्रिपूर जाळल्या जातो, त्यानंतर आरती होऊन या कार्यक्रमाचे समापन केले जाते.
दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम पण फार उत्साह साजरा केला जातो. दहीहंडीच्या वेळी भाविक भक्तांचे फार गर्दी झालेली असते, या गर्दीतच प्रसादाचे वितरण होऊन सायंकाळी महाप्रसादाचे वितरण केले जाते.
भाविक भक्त सायंकाळी या महाप्रसादाचे सेवन करून तृप्त झालेले असतात. तीस वर्षापासून चालत आलेली ही परंपरा वर्षानुवर्षे अशीच चालत राहो अशी सर्वांची अपेक्षा आहे.