मूर्तिजापूर – विलास सावळे
मूर्तिजापूर तहसील परिसरात रेतीची अवैध वाहतूक करताना महसूल विभागाने जप्त केलेल्या ट्रॅक्टर चालक-मालकाने तहसील परिसरातून चोरी केल्याची तक्रार दिनांक 27 डिसेंबर रोजी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली या तहसील परिसरातील ट्रॅक्टर चोरीची ही दुसरी घटना आहे या परिसरात संपूर्ण अन्नपुरवठा विभाग,
तहसील कोर्ट, संजय गांधी योजना, विक्री खरेदी विक्री साब रजिस्टर ऑफिस इत्यादी शासकीय कार्यालय असल्यामुळे येथे लाभार्थ्यांची खूप गर्दी असते कार्यालय परिसरातील जागा लहान असल्यामुळे कार्यालयातील कर्मचारी वर्ग आपले वाहन.
या परिसरात नो पार्किंग असताना सुद्धा येथे पार्क करतात, येथील कर्मचाऱ्यांच्या गाड्यावर कारवाई करण्यात माननीय तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या आदेशाला कर्मचाऱ्यांनी नाकारत आदेशाचे तीन तेरा वाजवले असा जनसामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
मूर्तिजापूर तालुक्यातील नदीवरील रेती माफीया यांची एवढी मजा झाली आहे की शासकीय अधिकाऱ्याला जुमानत नसून अवैधपणे रात्रीचे राज रोसपणे रेतीचे तस्करी करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. महसूल प्रशासन यात रेती तस्करावर कारवाई करण्या करिता कमकुवत पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या परिसरात रात्रीच्या वेळेस शिपायाची नेमणूक करण्यात यावी. तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी या अवैद्य गौण खनिज चोरावर कारवाई करण्याकरता समिती गठीत केलेल्या पथकाचे प्रमुख प्रमुख प्रफुल काळे ,रामराव जाधव, रवींद्र पुरी मंडळाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी सुनील मोहोळ, अन्वेष खडसे, संकेत गणवीर,
उमेश सोळंके वाहन चालक यांनी माना येथील गिरोटी नाला वर अवैध रेतीची उत्खनन करून चोरी चालू असल्याची गोपनीय माहितीवरून त्यांनी नाल्यातून ट्रॅक्टर एमएच 30 ए बी ७३९७ क्रमांकाचे ट्रॉलीवर क्रमांक नसलेल्या कॉलेजमध्ये कोणतीच परवानगी नसताना येथे भरून अवैध रेती भरून अवैद्य वाहतूक करत असताना कारवाई केली.
त्यावेळी तीन लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व पंचनामा करून दिनांक 26 डिसेंबर रोजी ट्रॅक्टर ट्रॉली तहसील कार्यालय परिसरात उभे केली, 27 डिसेंबर रोजी रात्री चालक व मालक सय्यद सिद्दिकी उर्फ पप्पू राहणार माना यांनीच चोरून नेला. या फिर्यादीवर शहर पोलीस स्टेशन बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शहर पोलीस स्टेशन मूर्तिजापूर करीत आहे.