Monday, December 23, 2024
Homeक्रिकेट१४ जानेवारी पासून रंगणार अप्पर डिप्पर प्रिमियर लीग चा थरार...

१४ जानेवारी पासून रंगणार अप्पर डिप्पर प्रिमियर लीग चा थरार…

गडचिरोली – पत्रकार, कर्मचारी, व्यापारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने दरवर्षी अप्पर डिप्पर प्रिमियर लीग व करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटक स्थळाना चालना मिळावी तसेच नागरिकांमध्ये खेळाप्रति रुची निर्माण करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी स्पर्धेचा उद्घाटन 14 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता गडचिरोली येथील चांदाळा रोडवरील गोटुल भूमि मैदानात होणार आहे. ही स्पर्धा 25 जानेवारीपर्यंत खेळविली जाणार आहे.

अप्पर डिप्पर प्रिमियर लीग स्पर्धेत गुरवळा सफारी, चपराळा फ़ॉरेस्ट, भंडारेश्वर फोर्ट आणि मुतनूर मॅजिक असे संघांचे नाव ठेवण्यात आले आहे यात डॉ यशवंत दुर्गे, बलराम सोमनानी, अनुराग पिपरे आणि निखिल मंडलवार संघ मालक राहणार आहेत. अप्पर डिप्पर करंडक मध्ये प्रथम 51 हजार द्वितीय 41 हजार तर तृतीय 21 हजार रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे.

क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्याहस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डा.अनंता कुंभारे राहणार आहेत. प्रमुख अतिथि म्हणून मोटार वाहन निरीक्षक सचिन जमखंडीकर, मोटार वाहन निरीक्षक चेतन पाटील, डा.यशवंत दुर्गे, प्रेस क्लबचे अध्यक्ष नंदकिशोर काथवटे, डा.प्रशांत चलाख, डा.बाळू सहारे, अविनाश भांडेकर आणि नपचे उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार उपस्थित राहणार आहेत.

25 जानेवारीला समारोपीय कार्यक्रमात आमदार डा.देवराव होळी माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार वितरित केल्या जाणार आहे सदर स्पर्धेत मोठ्या प्रमाणात क्रिकेट संघांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: