Wednesday, December 25, 2024
Homeगुन्हेगारीपातुर मध्ये अपघाताचा थरार चक्क हॉटेलमध्ये कार घुसली, एक ठार...

पातुर मध्ये अपघाताचा थरार चक्क हॉटेलमध्ये कार घुसली, एक ठार…

पातुर – निशांत गवई

पातुर शहराचा सायंकाळी अपघाताचा थरार पाहायला मिळाला चक्क एक गाडी हॉटेलमध्ये बसून पाण्याची कॅन भरण्यासाठी आलेल्या इसमाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पातुर पोलीस स्टेशन समोर असलेल्या दिलखुश हॉटेलमध्ये एका कारचालकाने भरधाव वेगात आपली एम एच 32 वाय 24 65 क्रमांकाचे मारुती अल्टो कार बसवली हॉटेलमध्ये पाण्याची कॅन भरण्याकरिता उभ्या असलेल्या एका व्यक्तीस कारची जोरदार धडक लागून तो कारखाली चिरडला गेला व गंभीर जखमी झाला सदर जखमीस प्राथमिक आरोग्य केंद्र पातुर येथे नेले असता डॉक्टरांनी तात्काळ अकोला येथे हलविण्यास सांगितले सदर जखमी सर्वोच्च रुग्णालय अकोला येथे नेले असता त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर अपघातातील मृतक अभिजीत अनिल शेंडे व 29 राहणार भंडारज तालुका पातुर येथील असल्याचे समजते दरम्यान मृत्यूवर कारचालक मोहम्मद अत्ताउर रहेमान वय 57 राहणार निर्माण कॉलनी गंगानगर बायपास अकोला यांचे विरोधात पातुर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: