सांगली – ज्योती मोरे
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टीका करण्याचा धंदाच ठाकरे गटांने दिल्याने त्याचे ते तंतोतंत पालन करत आहेत. त्याचं काम ते करू देत. आपलं काम आपण करत राहायचं. परंतु मी या ठिकाणी एक दोन वेळा नाही तर चार वेळा आमदार झालोय हे त्यांना सांगायच आहे.
अशी प्रतिक्रिया सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज व्यक्त केली आहे. नुकतीच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मिरज तालुक्यातील रस्त्यावरून पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना पालकमंत्री खाडे बोलत होते.