रामटेक – राजु कापसे
रामटेक तालुक्यातील शिवणी भोंडकी येथील तालुका शालेय क्रीडा स्पर्धेत स्वामी सितारामदास महाराज विद्यालय शिवनी भोंडकी या छोट्या खेड्या गावातील १४ वर्षे वयोगटातील मुली च्या संघाने उपान्त्य फेरीत (फायनल) जणप्रभा हायस्कूल रामटेक या संघावर विजय मिळवून पुन्हा सलग दुसऱ्यांदा रामटेक तालुक्याचे नेतृत्व करण्याची जिल्हास्तरीयवर संधी मिळवली आहे ,
सत्र २०२३-२४ मध्ये नागपूर जिल्हा जिंकून विदर्भ लेवल वर नागपूर जिल्ह्यचे या संघाने नेतृत्व केले होते.
या संपूर्ण विजयाचे श्रेय विद्यार्थीनी क्रीडा शिक्षक किसना पाटील. संयोजक केशव क्षिरसागर मुख्याध्यापक रामरतन पुडके , सह क्रीडा संयोजक किशोर बिनझाडे , शिवशंकर जिझोते दिनदयाल राहांगडाले , दिवाकर बंधाटे , हरिशजी हुड, राकेश ढोक, संजय सपाटे, कवडू ऊईके, जागेश्वर भिवगडे , यांना दिले स्वामी सितारामदास महाराज विद्यालय शिवनी भोंडकी चे संचालक तथा मा. सभापती नंदलालजी चौलिवार यांनी तसेच गावकऱ्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना गावाचे नाव लौकीक केल्याबद्दल अभिनंदन केले,
संपूर्ण परिसरातुन मोठ्या संख्येने सुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.पुढील जिल्हास्तरीय सामने होणार असून रामटेक तालुक्यातून हे संघ प्रतिनिधित्व करणार असून या करिता रामटेक तालुक्यातील समाजसेवक राहुल किरपान यांनी शुभेच्छा देत पुढील वाटचाली करिता शुभेच्छा चा वर्षाव केला आहे…