Monday, December 23, 2024
Homeराज्यशाळेत विद्यार्थ्यांना शिकवितांना हृद्यविकाराचा झटका आला अन् शिक्षकाचा प्राण गेला...

शाळेत विद्यार्थ्यांना शिकवितांना हृद्यविकाराचा झटका आला अन् शिक्षकाचा प्राण गेला…

नरखेड – काटोल स्थानिक कडू ले- आऊट, पंचवटी येथील रहिवासी शिक्षक धनराज यादवराव डंगारे (वय ५६) यांचे आज दुपारी १२ वाजता च्या दरम्यान ह्दयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले, उमठा येथील जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना वर्गात शिकवीत असतांना ते जमीनीवर कोसळून पडले.

शाळेतील इतर शिक्षकांनी व गावकऱ्यांनी त्यांना डाॅक्टरांकडे नेले परंतू तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या मागे आई, पत्नी, भाऊ व मुले असा बराच मोठा आप्तपरीवार असून त्यांच्या पार्थीवावर उद्या (दि.१ मार्च) ला सिंजर (त. नरखेड) या त्यांच्या मुळ गावी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल. शांत, संयमी व मृदू स्वभावाच्या शिक्षकाच्या जाण्याने संपूर्ण काटोल-नरखेड परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: