पातूर – निशांत गवई
एकीकडे राज्यात सतेचा संघर्ष शिगेला पोहचला आहे. पळवा -पळवीच्या नाटकीय घडामोडीने महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.. अशातच राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अजून प्रलंबित आहे. मात्र अकोला जिल्ह्यातील पातूरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल मध्ये एक आगळा वेगळा मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला.
या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी शालेय मंत्रीमंडळाला शपथ दिली. पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांना लोकशाहीची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. शाळेचे संस्थापक गोपाल गाडगे आणि कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यामध्ये प्रत्येक वर्गातून दोन प्रतिनिधी निवडून आले.
या निवडणूक कार्यक्रमात आचारसंहिता, नामांकन अर्ज दाखल करणे, अर्ज मागे घेणे,चिन्ह वाटप, प्रचार तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया समजवून सांगण्यात आली. निवडून आलेल्या उमेदवारांचे शालेय मंत्रीमंडळ स्थापन करण्यात आले. या मनात्रीमंडळाला शाळेच्या राज्यपाल सिद्धी पाकदुने हिने शपथ दिली. या सोहळ्यात शालेय मुख्यमंत्री म्हणून प्रणाली घुगे, उपमुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून संकल्प गाडगे, अर्थ मंत्री म्हणून तन्मय माहोकार, शालेय शिक्षण मंत्री म्हणून पार्थ वानखडे,
कृषी मंत्री म्हणून कृष्णा अत्तरकार, आरोग्यमंत्री सोनम मेहेरे, क्रिडा मंत्री कृतिका बोबडे, सांस्कृतिक मंत्री भक्ती गाडगे यांनी तर हर्षल वानखडे, सिद्धांत पेंढारकर, आस्था काळपांडे, वंश भांगे, सेजल राऊत, मनस्वी डिवरे, भावेश गाडगे, पूर्वी उगले, समर्थ पाटील, स्वरा गवई आदींनी पालकमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपालचे सेवक म्हणून यथार्थ चव्हाण, शिवम गिऱ्हे यांनी तर पोलीस म्हणून गौरी इंगळे, सार्थक शेंडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. सूत्रसंचालन श्रावणी गिऱ्हे हिने केले. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, नितु ढोणे, वंदना पोहरे, पल्लवी खंडारे, शीतल कवडकार, अविनाश पाटील, अश्विनी अंभोरे, पल्लवी पाठक, लक्ष्मी निमकाळे, नयना हाडके, प्रियंका चव्हाण, योगिता देवकर, भारती निमकाळे,हरीश सौंदळे, बंजरंग भुजबटराव, कल्पना इंगळे, रुपाली पोहरे, शुभम पोहरे आदींनी परिश्रम घेतले.