मृत नोंदीत बांधकाम कामगाराच्या वारसास महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते 2 लाख रूपयाचा धनादेश देण्यात आला…
कोल्हापूर प्रतिनिधी-राजेंद्र ढाले
बाबुराव सखाराम सरवळे हे बांधकाम कामगार येवती तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील रहिवासी त्यांच्यां पश्चात पत्नी शेवंती मुलगा राजकुमार व चार मुली असा मोठा परिवार पण दुर्दैवाने त्याचां 1/6 /2022 रोजी मृत्यू झाला ते रिपब्लिकन पक्षाच्या कामगार आघाडीचे सभासद व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणीकृत सदस्य असल्याने तात्काळ त्याच्या घरच्यानी कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे यांच्याशी संपर्क केला त्यांनी लागणारे सर्व संबंधित कागदपत्रे एकत्रित करून मंडळाकडे अर्ज केला.
1 मृत बांधकाम कामगार मयत झाल्यास त्याच्या अत्यंविधी साठी साहित्य खरेदी करण्यासाठी 10 हजार रुपये
2 वारसास प्रत्येक वर्षी 24000 असे (पाच वर्ष )तसेच
3 मृत बांधकाम कामगारांच्या वारसास दोन लाख रुपये असे लाभ तात्काळ मिळवून दिले.
आज त्यांना महाराष्ट्राचे कामगार मंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते व सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव साहेब यांच्या उपस्थितीत बाबुराव सरवळे यांच्या पत्नी .शेवंती सरवळे यांना 2 लाख रुपये चा प्राथनिधीक स्वरूपात धनादेश देण्यात आला
तसेच कामगार मंत्री ना.सुरेश भाऊ खाडे यांना बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले
यावेळी बोलताना गुणवंत नागटिळे म्हणाले बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी मंडळाच्या 28 विविध प्रकारच्या योजना कार्यान्वित आहेत परंतु काही अपुर्या माहितीमुळे बांधकाम कामगारांचा तोटा होत आहे त्यामुळे जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या माध्यमातून सभासद होऊन आपल्या साठी असणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा नोंदीत बांधकाम कामगारांना यांचे सर्व हक्क व न्याय
व मिळणारे सर्व लाभ तात्काळ मिळवून देण्यास रिपब्लिकन पक्षाची कामगार आघाडी बांधील आहे.
रिपब्लिकन पक्षाचे कामगार आघाडीचे कोल्हापूर शहराध्यक्ष प्रदीप मस्के जिल्हा संघटक अशोक कांबळे उपाध्यक्ष रवींद्र पाटील उपाध्यक्ष पांडुरंग चव्हाण हातकणंगले तालुका अध्यक्ष बाळासो कांबळे पट्टणकडोली शहराध्यक्ष महादेव गायकवाड तालुकाध्यक्ष कृष्णात लोखंडे शहर संघटक बाळू लोहार सुरेश कांबळे आदी उपस्थित होते