नरखेड – अतुल दंढारे
काटोल तालुक्यामध्ये टारगेट प्रमानेअनेक घरकुलांना मान्यता मिळणार आहे. रमाई ,शबरी ,पंतप्रधान आवास योजनाद्वारे अनेकांची घरकुल मंजूर होणार आहे.त्या करिता टप्याटप्याने एक लाख विस हजार रुपये फक्त त्यांना अनुदान मिळणार आहे.
घर बांधण्यासाठी लागत खर्च अडीच लक्ष रुपयांपेक्षाही जास्त येत असल्यामुळे आणि बाजारभावाच्या वाढत्या किमतीमुळे आणि इतर अडचणीमुळे घरकुल अनुदान लाभार्थी फार अडचणीत सापडलेला आहे. काटोल पंचायत समिती तर्फे अनुदानात वाढ होण्याच्या बाबत महाराष्ट्र सरकारला विनंती करण्यात आलेली आहे.
घरकुल अनुदानासाठी अडीच लक्ष रुपये मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे काटोल पं स. सभापती संजय डांगोरे यांनी केलेली आहे. ग्रामीण भागामध्ये वाढीव कार्टींग खर्च ,रेती मिळण्याची अडचणी, विटा -सिमेंट यांचा वाढता बाजार भाव याच्यामुळे अनुदानात वाढ व्हावी अशी ग्रामीण जनतेची सुद्धा जोरदारपणे मागणी असून त्याकडे सरकारने त्वरित लक्ष द्यावे अशी विनंती मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे यांनी केलेली आहे.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षे नंतर मंजूर होणारे घरकुल ही गरिबांना आता एक प्रकारे डोकेदुखी ठरत आहे. घरकुलाचे स्वप्न पाहता-पाहता दिवस घालवणारे गरिबांना कुणीही उधारी वर सुद्धा साहित्य देऊ शकत नाही. शासनाने शहरात अडिच लक्ष आणि ग्रामीण भागात सवा लक्ष हा कुठला न्याय? शहरी आणि ग्रामीण असा भेद -भाव न करता सर्व घरकुल योजनेत दुपटीने वाढ करण्यात यावी. अशी मागणी ग्रामीण भागातील नक्कीच जोर धरत आहे.