रामटेक – राजु कापसे
रामटेक येथील स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार मधील इयत्ता 6 क च्या विद्यार्थ्यांनी कार्यानुभव विषयाच्या अंतर्गत राखी तयार करण्याचा उपक्रम राबविला आणि बनवलेल्या राख्या विक्री करण्याचा अनुभव घेतला.
राखी विक्रीचा शुभारंभ विज्ञान भारती नागपूर समन्वयक माधुरी देहटकर, सह समन्वयक राजू तांदूळकर तसेच प्रसिद्ध पांडू लिपी तज्ञ आशिष जैन यांच्या हस्ते शुभारंभ केला.
कार्यानुभव या विषयाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी म्हणून शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरेख राख्यांची निर्मिती केली. विद्यार्थ्यांनी व्यवहार ज्ञान ग्रहण करावा यासाठी सुद्धा विद्यालयाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम उपक्रम घेण्यात येतात.
त्यापैकी राखी तयार केल्यानंतर राखी विकण्याचा उपक्रम पहिल्यांदाच देवलापार सारख्या दुर्गम भागामध्ये करण्यात आला करण्यात सदर विद्यार्थ्यांनी त्यांचे कार्यानुभव विषयाचे शिक्षक या प्रकल्पाचे मार्गदर्शक उल्हास इटानकर यांच्या माध्यमातून रक्षाबंधनच्या पूर्वी राखी बनवायला लागणारे साहित्य बोलावून घेतले व मागील तीन-चार दिवसांमध्ये विविध प्रकारच्या राख्या तयार केल्या तयार झालेल्या राख्या व्यावसायिक दृष्टीने उत्तम व्हाव्यात म्हणून त्यांची पॅकिंग सुद्धा करण्यात आली व आज रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येवर सदर राख्यांची विक्री स्वर्गीय लक्ष्मीदेवी अग्रवाला कॉन्व्हेंट देवलापार उदय विद्यालय देवलापार माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा निमटोला गुरुकुल आश्रम शाळा निमटोला स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार तसेच स्वामी विवेकानंद महाविद्यालय देवलापार या शाळा महाविद्यालयात तयार केलेल्या राख्यांची विक्री केली राखी विक्रीतून आलेला नफा हा गरजू लोकांना मदत करणाऱ्या सेवाभावी संस्थेला देण्याचा निर्णयही आज 6 क च्या विद्यार्थ्यांनी घेतला व्यवसायातील विविध पैलूंचे प्रत्यक्ष अनुभव घेऊन अध्ययन केले व्यवहार ज्ञान व राखी बनविण्याचा कौशल्य विकास या दोन्ही दृष्टीने हा रक्षाबंधनचा प्रकल्प खूपच उपयुक्त आहे असे विद्यालयाचे प्राचार्य जगन्नाथ गराट यांनी व्यक्त केले तर पर्यवेक्षक जयंत देशपांडे यांनी सदर उपक्रम दरवर्षी घ्यावा असे विद्यार्थ्यांना सुचविले.
गावातीलच उदय विद्यालय देवलापारचे मुख्याध्यापक शंकरपुरे व माध्यमिक आदिवासी विद्यालय निमटोला चे मुख्याध्यापक कंगाले यांनी देवलापार सारख्या दुर्गम भागात प्रथमतः झालेल्या राखी निर्माण प्रकल्पाची, विद्यार्थ्यांची व मार्गदर्शक शिक्षकांची प्रसंशा केली.