अखेर एल.एल.बी.-3 व 5 वर्षीय अभ्यासक्रमातील प्रवेश नोंदणी करीता मुदतवाढ…
अकोला – रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद च्या वतीने सिईटी सेल महाराष्ट्र राज्य संचालक यांना ई मेल द्वारे दिनांक 14 जुलै रोजी पत्र देऊन एल.एल.बी.-3 व 5 वर्षीय अभ्यासक्रमाकरिता प्रवेश नोंदणी प्रक्रियेकरिता मुदत वाढ देण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले होते.सदर निवेदनाची दाखल घेत सीईटी सेल द्वारा एल.एल.बी. 3 वर्षीय अभ्यासक्रमाकरिता 20 जुलै 2024 ते 24 जुलै 2024 अशी मुदत वाढ देण्यात आली असून त्याचप्रमाणे एल.एल.बी.-5 वर्षीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना सुद्धा 20 जुलै 2024 ते 13 ऑगस्ट 2024 पर्यंत तिसऱ्या व इन्स्टिट्यूट लेव्हल करिता प्रवेश नोंदणी साठि मुदत वाढ देण्यात आली असून ह्याचा फायदा विधी क्षेत्रात शिक्षण घेत असणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार असून रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे अकोला जिल्हाध्यक्ष आकाश हिवराळे यांचे सर्व विद्यार्थ्यांकडून आभार व्यक्त होत असून मुदत वाढीकरिता सीईटी सेल चे रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला जिल्हाध्यक्ष आकाश हिवराळे यांनी आभार मानले आहेत.