देशाच्या प्रत्येक नागिरका मधे नेत्रदाना ची भावना रुजली तर देशातील अनेक नेत्रहीनांच्या जीवनातील अंधकार निश्चित दूर होउ शकतो आनी या पावन क्षेत्रात अमरावती येथील हरिणा फाउंडेशन चे कार्य अनुकरणीय व प्रशंसनीय आहे ,हरिणा जे कार्य करित आहे हिच खरी मानव सेवा ।हे उदगार भारत सरकार चे केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गड़करी यानी हरिणा फाउंडेशन द्वारे आगामी 10 जून जागतिक नेत्रदान दीना निमित्त आयोजित पाऊले चालती उजेडाची वाट या कार्यक्रमच्या प्रसिद्धि पोस्टर चे विमोचन करतांना काढले।
हरिणा फाउंडेशन द्वारा 10 जून रोजी आयोजि “पाऊले चालती उजेडाची वाट'” च्या पदयात्रेत प्रत्येक नागिरकांने स्वयफूर्ति ने उपस्थित राहून नेत्रदाना संकल्प घ्यावा व देशाच्या अंधत्व निवारण मोहिमेला बळकट करावे अशे आवाहन ही त्यानी केले सोबतच हरिणा च्या करायचा गौरव म्हणून अभिनंदन रूपी लिखित संदेश सुद्धा देण्याची घोषणा केली।
हरिणा चे अध्यक्ष मनोज राठी यानी हरिणा च्या आजपर्यंत घडवून आलेल्या नेत्रदान ,नेत्रप्रत्यारोपन,अवयव दान,देहदान तसेच दवाखान्या च्या माध्यमातून होत असलेली नेत्र रुग्णाच्या सेवेचि सविस्तर माहिती दिली।हरिणा हे नाव कशे ठेवले हे गड़करी जी यानी उत्सुकतेने विचारले।
गड़करी साहेबांच्या भेटिचे नियोजन विजयजी मोहता यानी पार पाडले तर आभार नरेश सोनी यानी मानले
नागपुर येथील गड़करी यांच्या कार्यालयात सदर पोस्टर चे विमोचन समारोह मधे हरिणा चे , चंद्रकांत पोपट ,राजेन्द्र भंसाली,शरद कासट,मुकेश लोहिया,सुरेंद्र पोपली,
पुरषोत्तम मूंधड़ा, कमलकिशोर मालानी उपस्थित होते।