धीरज घोलप
शिवसेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली माज़ी आमदार- शिवसेना सचिव व प्रवक्ते तसेच “राष्ट्रीय कर्मचारी सेना” अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वात आज दिनांक २५/०८/२०२३ रोजी दुपारी ठीक ०२:०० वाजता कोटक महिंद्रा बॅंक, मुख्य कार्यालय, कोटक इंन्फिनिटी पार्क, दिंडोशी, मुंबई येथे कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापनासोबत कामगारांच्या कायदेशीर असलेल्या न्याय हक्क मागण्यांसाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी व्यवस्थापनाकडून सर्व विषय समजावून घेण्यात आले व यावर सकारात्मक पाऊले उचलून लवकरात लवकर चांगला तोडगा काढण्यात येऊन बॅंकेच्या कर्मचारी वर्गाला दिलासा देण्यात येईल असा प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी शिवसेना स्थानिक विभाग प्रमुख गणेश शिंदे, कुणाल सरमळकर, दिलीप नाईक व उपाध्यक्ष श्रेयस पाडावे तसेच चिटणीस तातू नाईक, किरण साळुंखे, किसन वाळूंज, रितेश शिवडीकर, सचिन लिमण, सह चिटणीस संतोष खोत आणि गोरेगांव – दिंडोशी विधानसभा विभाग क्रमांक ०३, मधील उपविभाग प्रमुख शाखाप्रमुक व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्यने कामगारांच्या न्याय व हक्कासाठी उपस्थित होते.