येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपणच वंचितचे उमेदवार असे राजरोसपणे मतदारसंघात सांगणारे भावी उमेदवार सातव्या आसमान मध्ये उडत आहेत तर ही बाब पक्षाच्या लक्षात येतात पक्षाच्या वतीने १० जुलैला एक निवेदन जारी करण्यात आले होते. ते निवेदन आताचे उमेदवारांचा ओघ बघता हे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हे पत्र गेल्या दोन महिन्यापूर्वी पक्षातर्फे जारी करण्यात आले असल्याचे कळते. मात्र या पत्रामुळे काही प्रमाणात स्वयंघोषित उमेदवारांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत.
वंचित बहुजन पक्षाच्या कार्यालयाकडून एक निवेदन सोशल मिडियावर जारी करण्यात आल्याच हे पत्र आहे. ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारणाच्या वतीने आपणास कळविण्यात येत आहे की महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीने अद्याप पार्लमेंटरी बोर्ड स्थापन केलेले नाही, पक्षाच्या लक्षात असे आले आहे की अनेक विधानसभा मतदारसंघात काही स्वयंघोषित उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मलाच उमेदवारी मिळाली आहे असे सांगत फिरत आहेत.
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकर्त्यांच्या वतीने सर्व जनतेस आव्हान करण्यात येत आहे की पक्षांनी अद्याप पर्यंत एकाही विधानसभा मतदारसंघात उमेदवार निश्चित केलेले नाही त्यामुळे जे कोणी स्वयंघोषित उमेदवार त्यांना उमेदवारी मिळेल असल्याचे सांगत फिरत आहेत ते सामान्य मतदारांची तसेच कार्यकर्ते दिशाभूल करून अफवा फसविता आहेत सर्व जनतेला व कार्यकर्त्यांनी असे आपोआप असणाऱ्या स्वयंघोषित उमेदवारावर विश्वास ठेवू नये…असे या पत्रात नमूद आहे. या पत्राची काही स्वयंघोषित उमेदवारांनी धास्ती घेतली असून त्यांनी मतदार संघात आता दुसरे प्रयोग सुरु केल्याचे समजते.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित आणि इतर काही पक्ष मिळून तिसरी आघाडी स्थापन होणार असल्याने तीनचार पक्ष मिळून जागावाटप केल्यानंतरच कोणाला उमेदवारी मिळणार हे स्पष्ट होईल तो पर्यंत कोणी कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी विस्वास ठेवू नये. असे या पत्रावरून कळते. मात्र हे पत्र दोन महिन्यापूर्वीच असल्याचे याबाबत थोडी शंका निर्माण होते, हे पत्र खरे की खोटे? असले तरी या पत्राची सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.