मूर्तिजापूर – पुलाला कचरा अडकल्यामुळे कवठा शेलु व बापोरी शिवारातील शेकडो येक्कर जमीन पाण्याखाली जाते. आज युवा सरपंच वैभव गजाननराव कोरडे यांच्या विचाराने शेतकऱ्यांवर पुर परिस्थिती निर्माण होण्या अगोदर हा कचरा काढण्यात आला. पाऊस कमी जरी पडला तरी ज्या दिशेकडून पुराचे पाणी येते त्या दिशेने पेढी नदी पूर्ण पणे भरलेली असते जिकडे पाणी जाते तिकडून नदी खाली असते.
पेढी नदी च्या पुलाला ऐकून 21 गाले पाणी जाण्यासाठी आहे त्यातील फक्त 4 गले उघडे होते त्यामुळे पूर्ण पाणी गावात , शेतात जाण्याची एक भीती आज तरी टळली. सुनियोजित वेळेत आज हा कचरा कढण्यामागे सरपंच यांनी फार मोठी कामगिरी केली. असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यामध्ये पलसिद्ध कन्ट्रक्शन या कंपनीचे ओनर राजेंद्र काटे व त्यांचे सहकारी यांच्या मदतीने हे काम करण्यात आले.