शिर्ला ग्रामपंचायत कामाची चौकशी होणार काय…
पातुर – निशांत गवई
पातुर तालुक्यातील शिरला ग्रामपंचायत ही भ्रष्टाचाराने भ्रष्ट झाली असून या ग्रामपंचायती चौकशी केल्यास कोटी रुपयाचे घवाड बाहेर निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिनांक 11 डिसेंबर रोजी तेलगोटे कॅम्पुटर सेंटरवर सचिव डीवरे व सरपंच सौ अर्चना शिंदे यांच्यात ढापा टाकण्यावरून बिले काढण्यावरून मोठमोठ्याने तू तू मै मै झाली.
यामध्ये अनेक किस्से बाहेर निघाले या घटनेमध्ये एकमेकांचे उने दूने काढताना ठराव न घेता अनेक कामे व बिल काढण्याचा प्रताप यांच्या तोंडून उघड झाला. ग्रामसेवक मुसळे यांनी मध्यस्थी करत हा वाद रस्त्यावर न करता .चार भिंतीच्या आत चर्चा करा असा सल्ला दिला. यावेळी सरपंचाने सचिवाची चांगलीच खरडपट्टी काढण्याचा प्रयत्न केला.
सचिवांचा मोबाईल स्विच ऑफ असल्याचा म्हटले असता मोबाईल हा माझा मालकीचा आहे.असा सरपंचांना दम दिला .मला काही फरक पडत नाही माझी बदली करा. या घटनेची वेळी ग्रामस्थ, अधिकारी राहुल उंदरे, पीपी चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. या घटनेवरून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातला भ्रष्टाचार बाबत किती मोठा अनुभव आहे हे दिसून येते या घटनेची पातुर परिसरात चर्चेला पेव फुटलेले आहे.
१) ग्रामसेवक सतत गैरहजर राहतात. शासकीय कामे वेळेवर करीत नाही. ग्रामस्थांचे अनेक कामे खोळंबली आहे अनेक विकास कामे होत नाही.
सौ अर्चना सुधाकर शिंदे सरपंच
२) दोन दिवसांपूर्वी अपंगांनी दिले होते ठिय्या आंदोलन
शिर्ला ग्रामपंचायत मधील अपंगांसाठी येणाऱ्या निधीचे वाटप करण्यात आले नव्हते पंचायत समिती आवारात अपंगांनी ठिय्या आंदोलन केले होते.
३) कर्मचारीवर अधिकार्यावर वचक नाही
पातुर पंचायत समितीमध्ये कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यांचा कोणताही वचन राहिला नसून पदाधिकारी व अधिकारी यांना कर्मचारी जीवनात नसल्याचे प्रत्यय येत असून पंचायत समितीमध्ये दुसऱ्या जिल्ह्यातील दोन चमचे करीत चमचेगिरी करून माध्यमातून कर्मचाऱ्यांना अभय कसे मिळेल याकरिता प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे