रामटेक पोलिसांची कामगिरी
सराखा (बोरडा) शिवारातील घटना
आरोपींकडुन मिरची पावडरसह शस्त्र व वाहने जप्त
रामटेक – राजू कापसे
दुचाकी, चारचाकी वाहनांसह मिरची पावडर व शस्त्र सोबत ठेवून दरोड्याच्या तयारीत असलेल्या ४ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात रामटेक पोलिसांना यश आले आहे काल दिनांक 11 जुलै च्या रात्री साडेनऊ वाजता दरम्यान सराखा बोर्डा शिवारात रामटेक पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. घटनाप्रसंगी एकुण ७ आरोपी होते मात्र रामटेक पोलीसांची चाहुल लागताच ३ आरोपी पळुन जाण्यात यशस्वी ठरले.
पोलिस स्टेशन रामटेक येथुन प्राप्त माहितीनुसार, दि.११ जुलै रोजी रात्री ९.३० वा. दरम्यान रामटेक चे पोलीस निरिक्षक श्री हृदयनारायण यादव यांना मुखबिराव्दारे माहीती प्राप्त झाली कि, पो.स्टे. रामटेक हद्दीतील मौजा सराखा बोरडा येथील शिवारात अस्मिता ऑर्गेनिक फार्म च्या पाठीमागील शेत शिवारात एक ओमणी गाडी व मोटारसायकल उभी करून काही इसम त्यामध्ये संशयीत रित्या वावरत आहेत.
लागलीच पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार यांनी पोलीस कर्मचारी अमोल इंगोले, शरद गिते यांचेसह काही गावकऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठल. दरम्यान अस्मिता आर्गनिक फार्मचे पाठमागील परीसरात स्टाफ चे व गावातील काही इसमांचे मदतीने पाहणी केली असता, सदर ठीकाणी एक ओमणी कार क्र. एम.एच. ३९ बि. बि. ५९३९ उभी होती तसेच सदर कार चे पाठीमागे एक होंडा अॅक्टीवा मोपेड क्र. एम.एच. ३५ ए.डी. ४६०७,
होंडा शाईन मो.सा.क. एम. एच. ४० बि.वाय.८१८९ , सिग्म्स झेडआर मोपेड क्र. एम. एच.४० बि.क्यु. १०५६ बजाज डीस्कव्हर, मो.सा.क. एच. एच. ३५ डब्ल्यु ४००३, , हिरो सी.डी. डिल्क्स मो.सा.क. ३१. सी.यु.५७८७ असे सर्व वाहने अस्मिता फॉर्म हाउस पाठीमागील शिवारात झाडीझुडपात लपवुन ठेवलेल्या दिसुन आले होत्या. सदर ठीकाणी काही इसम अंधाराचा फायदा घेवुन झाडी झुडपात लपुन बसल्याचे दिसुन आल्याने त्यांना पोउपनि लांजेवार यांनी आवाज दिला असता सदर ठीकाणी लपुन बसलेले काही इसम अंधाराचा फायदा घेवुन पळ काढत सदर ठीकाणावरून निघुन गेले व काही इसम घटनास्थळी मिळुन आलेले. त्यामध्ये चिंतामणी हरी मेहर वय ३५ वर्ष रा सालई हिवरा बाजार ता. रामटेक,
मिथुन हरी मेहर वय ३२ वर्ष रा सालई हिवरा बाजार तह रामटेक , प्रणय ललीत दखणे वय २१ वर्ष मामा चौक गोंविदपुर गोंदीया , राजकुमार दुर्जन कालसर्पे वय २२ वर्क्षरा बाजार चौक कुराडी तह, गोरेगांव जि. गोंंदीया असे सांगीतले सदर इसमाकडुन अधिक माहीती प्राप्त केली असता सदर ठीकाणावरून पळ काढून निघुन गेलेले इसमाचे नावे विचारले असता राहुल राउत वय अंदाजे २२ वर्ष, अविनाश मरकाम वय २५ वर्ष रा. सालइ ( हिवरा बाजार ) तह रामटेक,
इंद्रजित उर्फ आय. जी. सलामें वय ४२ रा. सालई हिवरा बाजार तह रामटेक असे सांगीतले. मिळुन आलेल्या ४ इसमाचे ताब्यातुन ०२ मोबाईल १३०००/रु, तसेच एका कापडी कॅरीबॅग मध्ये लाल रंगाची मिरची पावडर अंदाजे ५०० ग्राम कि.५०, तसेच एक लाकडी दांडा कि. २०/ रु एक लोखंडी रॉड कि, ५०/रु एक चाकु कि, २००/रु असे शस्त्रासह सराखा बोरडा शिवारात दरोडा टाकण्याचे इरादयाने एकत्र जमल्याचे खात्री झाल्याने त्याचे ताब्यामधुन एकुण ३,६३,३२०/रु मुद्देमाल पचासमक्ष जप्त करून नमुद आरोपी यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन रामटेक येथे अप क. ४६१/२३ कलम ३९९, ४०२, भा.द.वी. सह कलम ४/२५ भा.ह. का अन्वये गुन्हा नोंद करून गुन्हयाचा पुढील तपास पो. निरीक्षक. एच. एस. यादव यांचे मार्गदर्शनात पोउपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार हे करत आहेत.