सांगली – ज्योती मोरे
सांगली – प्रभाग १४ मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे सन्मती मेडिकल समोर रोडवर आर सी सी गटारीचे काम झाले होते, तिथे मातीचे ढीग आहेत तसे ठेवले होते, पण गणपती उत्सव असलेने लोकांना ये जा करण्यास अडचण येत होती, त्यामुळे नागरीकांच्या तक्रारी येत होत्या.
त्यामुळे ३-४ दिवसापूर्वी संबधित ठेकेदार यांना मातीचे ढीग काढून घेणे याबाबत कळवले होते, पण काम नुसतेच झाले असलेने त्यावरून मोठी वाहने गेली तर केलेले काम खराब होणार, म्हणून तात्काळ ढीग काढले न्हवते. त्यांनी ४ दिवसापूर्वीच सोमवारी मातीचे ढीग काढून घेऊन रस्ता मोकळा करून देतो असा शब्द दिला होता.
त्याप्रमाणे आज संबंधित ठेकेदारांनी आज मातीचे ढीग काढून घेण्यास सुरुवात केली . त्यावेळी जागेवर जाऊन सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम यांनी चालू कामाची पाहणी केली व त्यांना लवकर रस्ता रिकामा करून रस्ता स्वच्छ करून देण्याच्या सूचना वजा विनंती केली.