सांगली — ज्योती मोरे.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारका जवळील साने गुरुजी ओपन स्पेस मधील हॉलीबॉल क्रिकेट ग्राउंड लगतचा रस्ता मुरमीकरण करण्यासाठी नगरसेवक विष्णू माने यांच्या स्थानिक विकास निधीतून काम मंजूर झाला असून त्यांनी आज या कामाची पाहणी केली.यावेळी विकास म्हेत्रे, माणिक पांढरे, राकेश उबाळे,दत्ता कुल्हाळ, राहुल दुधाळ आदी नागरिक उपस्थित होते.