गडचिरोली – मिलिंद खोंड
अहेरी कृषी ऊत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल अत्यंत चुरशीचा ठरला.एकुण १८ पैकी दोन ऊमेदवार पुर्वीच अविरोध निवडुन आल्यानंतर ऊर्वरीत १६ जागांसाठी निवडणुक झाली.त्यात माजी सभापती रविंद्ररावबाबा आत्राम व अजय कंकडालवार गटाचे ९ उमेदवार आणि राष्ट्रवादी-भाजप युतीचे ७ उमेदवार निवडुन आले. ५ ते ६ उमेदवारांचा अवघ्या एक-दोन मतांनी पराभव झाला तर एका उमेदवाराची ईश्वरचिठ्ठीने निवड करावी लागली.
मतगणना सुरु होताच सुरवातीला भाजप-राका युतीचे व्यापारी-अडते गटातुन दोन व ग्रामपंचायत गटातील तिन असे एकुन पाच ऊमेदवारांनी सहज विजय मिळवला होता.त्यामुळे एकतर्फी निकाल लागेल असे वातावरण निर्माण झालेले होते.सहकार गटात अत्यंत तुल्यबळ निकाल लागत होते त्यामुळे ऊत्कंठा शिगेस पोहोचली होती.
या निवडणुकीत सार्वत्रिक निवडणुक सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून रविंद्रराव भगवंतराव आत्राम, सैनु मादी आत्राम, अनिल सोमाजी करमरकर, अजय रामय्या कंकडालवार, बोदी कोलु बोगामी, सहकारी संस्था महिला राखीव गटातून मालुताई रामा ईस्टाम,
निर्मला अशोक येलमुले, सहकारी संस्था इ. मा. व. गटातून अजय रामय्या कंकडालवार, सहकारी संस्था वि.जा./भ. ज. गटातून येल्ला मूत्ता तोकला, भाजपा – राष्ट्रवादी युतीचे उमेदवार व्यापारी गटातून विनोद व्येंकटेश अकणपल्लीवार, निलेश मधुकर पुल्लुरवार विजयी झाले आहेत. निकाल जाहीर होताच रविंद्रराव बाबा आत्राम-अजय कंकडालवार गटाच्या ऊमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अहेरी नगरात जुलूस काढुन विजयोत्सव साजरा केला.