Sunday, September 8, 2024
spot_img
Homeमनोरंजनमुंबईच्या आसमंतात झळकला "चांदतारा"६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे निकाल...

मुंबईच्या आसमंतात झळकला “चांदतारा”६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे निकाल जाहीर…

मुंबई – गणेश तळेकर

६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई-२ केंद्रातून विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या ‘चांदतारा’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच पोलीस कल्याण केंद्र, मुंबई या संस्थेच्या ‘एकेक पान गळावया’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज (२९ डिसेंबर) एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई-२ केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे:-

महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड या संस्थेच्या ‘घायाळ’ या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक सुनिल कदम (एकेक पान गळावया), द्वितीय पारितोषिक रमाकांत जाधव (चांदतारा), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (चांदतारा), द्वितीय पारितोषिक विनोद राठोड (आर्यम), नेपथ्य: प्रथम पारितोषिक प्रदिप पाटील (चांदतारा), द्वितीय पारितोषिक कविता विभावरी (घायाळ), रंगभूषा प्रथम पारितोषिक उल्लेश खंदारे (घायाळ), द्वितीय पारितोषिक वैभव सावंत (चांदतारा),

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक सुशिल इनामदार (एकेक पान गळावया) आणि वैदेही मुळे (घायाळ), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे डॉ. सोनल शिंदे (दिवान-ए-मख्फी), सृष्टी शेलार (अंगणातली रांगोळी), समृध्दी खडके (मन मनास उमगत नाही), तनिषा वर्दे (चल थोडं अॅडजस्ट करु), अदिती खानविलकर (आर्यम), भावेश टिटवळकर (चल थोडं अॅडजस्ट करु), सुशिल घाडगे (द आऊटबर्स्ट), सायली साळवी (द रेन इन द डार्क), रोहीत खरवडे (द आऊटबर्स्ट), रविंद्र गिरकर (देव चोरला माझा), सोमनाथ शिंदे (दिवान-ए-मख्फी).

दि. २१ नोव्हेंबर, २०२३ ते २८ डिसेंबर, २०२३ या कालावधीत यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १७ नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून वसंत सामदेकर, ईश्वर जगताप आणि प्राची गडकरी यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम व द्वितीय आलेल्या नाटकाच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी आणि कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: