Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनमहाराष्ट्राचा खरा आवाज, हाच खरा मराठी बाणा चित्रपट "तुझ्यासाठी काहीही...", अमेरिकेत जुरी...

महाराष्ट्राचा खरा आवाज, हाच खरा मराठी बाणा चित्रपट “तुझ्यासाठी काहीही…”, अमेरिकेत जुरी ऑस्करवाल्याना कोर्टात खेचणारा पहिला मराठी माणूस..!

ऑस्कर ला जाणारा अजून एक मराठी चित्रपट, प्रथमच एक आगळे वेगळे अवयवदान जनजागृती अभियान, देशप्रेम, प्रेम , प्राणी प्रेम…!

मुंबई – गणेश तळेकर

हा चित्रपट बनवणे माझ्यासाठी एक दिव्यस्वप्न होते, मी अमेरिकेत अनेक फ्रेऱ्या मारल्या , मला ऑस्करच्या लोकांनी आणि आपल्या भारत चित्रपट युनियन , दिग्गज लोकांनी माझं हसू केले, अरे अनेक मोठे मराठी हिंदी सिनेमे कुठे आणि तुझा हा सिनेमा कुठे, कश्याला या भांडगडीत पडतो,

असे बोलून माझे खच्चीकरण केले पण मी जिद्द पकडली आणि ऑस्कर पर्यन्त जाणार म्हणजे जाणार हे मनाशी ठरवून मी सर्व नियम अटी ऑस्कर च्या पूर्ण केल्या, तरीही ऑस्कर वाल्यांनी दाद दिली नाही , त्यांना म्हणालो एकदा माझा सिनेमा बघा मग रिजेट करा हवे तर पण ते ऐकायला तय्यार नव्हते,

मग शेवटी आपला मराठी बाणा, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या भारतीय संविधानानुसार त्याच्या वर केस केली आणि मला न्याय मिळालाच पाहिजे म्हणून आज लढत आहे, यासाठी मला आता गरज आपल्या मोठ्या कलाकार , चित्रपट युनियन, आणि महाराष्ट्र शासन , भारतीय केंद्र सरकार यांची…!

मी मीडियाशी ही बोललो पण कोणत्याही मीडिया ने माझी दखल घेतली नाही. पण आज ज्या छोट्या news मीडिया आहेत त्यांनी माझी दखल घेतली आहे. त्यात आवाज माझा news , महाव्हॉइस news, लोकशासन news ,लोकनिर्माण news, शिवसत्ता टाईम्स news , बुलंद पोलीस टाइम्स news, एकल मराठी news, जनहित महाराष्ट्र news आहेत.

या नव्या चित्रपटामध्ये घेऊन आले आहेत डॉ.संजय गायकवाड ( दिग्दर्शक – गीतकार – संगीत , कथा ), एका कृष्णाची राधेला भेटण्यासाठी , मिळवण्यासाठी आणि कोणतेही नातं नसताना दुसऱ्यांसाठी आपल्या शरीरातील एक भाग दान द्यायची चांगली वृत्ती या चित्रपटात दाखवण्यात आली आहे , नवीन कृष्णां , राधा , मीरा यांना पाहायला नक्की या…!

“प्रेमासाठी काहीही…! म्हणत प्रेम करणारा कृष्णा नक्की पहा…!

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: