माहे में, जुन, जुलाई २०२३ पर्यंत
२८ जुलै काही लोकांना दिले,ते खान्या योग्य नाही
रामटेक – राजू कापसे
पवनी येथे स्वस्त धान्य राशन ची दुकान आहे.तेथे पवनी आणि वनपवनी येथील लाभार्थ्यांना राशन मिळते. सदर गावातील लाभार्थ्यांना मौजा पवनी येथील स्वस्त धान्य दुकान आर नं. ५०, जे. डी. जैतगुडे, रा. नागपूर येथे कायम स्वरूपी राहाते. हे कोणत्याही व्यक्तीच्या मदतीने राशन वाटप करतात.
हा व्यक्ती राशन कार्ड लाभार्थ्यांना नियमित राशनचा वाटप करित नाही में महिन्यामध्ये त्यांनी एकही लाभार्थ्यांना राशन वाटप केल नाही आणि जुन मध्ये पण राशन वाटप केल नाही आता जुलै महिन्यामध्ये दिनांक २८/०७/२०२३ ला सकाळी ९. ३० वाजता आला व काही राशन धारकांना धान्य वाटप केले ते धान्य खान्या योग्य नाही.
स्वस्त धान्य वाटप करणार्यांने सांगीतले की राशन पुरवठा धारक यांचाकडून असा धान्य आलेला आहे.तसेच स्वस्त धान्य दुकानदार हा नागपूर येथे राहत असून त्यांनी आपल्या धान्य दुकानात दुसरा व्यक्ती ठेवलेला आहे. तो बरोबर धान्य वाटप करीत नाही.
तसेच पवनी आणि वनपवनी येथील स्वस्त धान्य दुकान एकच असून आम्ही वनपवनी येथील कार्ड धारकांना धान्य बरोबर मिळत नाही. करीता वनपवनी येथे स्वस्त राशन दुकान वेगळे देण्यात यावे जेणे करून पवनी व वनपवनी येथील कार्ड धारकाना धान्य मिळण्यास सोईस्कर होईल व सर्व कार्ड धारकांना धान्य मिळेल.
तहसीलदार यांना निवेदना मार्फत
विनंती केली आहे की आपण स्वतः मौका चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याची मागनी गोंडवाना गणतंत्र पार्टी चे प्रदेश अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य हरिष उईके यांनी केली आहे.
राशन कार्ड धारकाचे नाव
दिनेश रतन सर्याम ,ज्योती मरसकोल्हे,शिवराम,रोशन आर भट्टी,पार्वती,शेषराव सलामे,सुभाराम उईके,शेषराव मरसकोल्हे ,अक्षय धुर्वे,सुगंधा धुर्वे,कलाबाई शर्मा,पुनम गुंढरे ललिताबाई टेकाम ,पार्वतीबाई टेकाम,ममता टेकाम,
मुन्नीबाई मरकाम,सुनंदा वाडिवे,सिंधुबाई सर्याम,बेबीबाई वरखडे,कविता टेकाम, पार्वतीबाई कुमरे,अनुकमाबाई किरनाके,
खुलकनबाई सलामे,कौतिकालाई सलामे कलाबाई कोवाचे सह आदी राशन कार्ड धारक निवेदन देते वेळी उपस्थीत होते.