रामटेक – राजु कापसे
गेल्या काही दिवसांपुर्वी रामटेक बसस्थानक येथे आलेल्या फिर्यादी पुनम संतोष पारधी वय ३८ वर्ष रा. बैतुल हिचेजवळील ४ आरोपींनी एकुण ३९ हजार ३०० रुपयांचा माल चोरुन पसार झाले होते. तेव्हा रामटेक पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवित चारही आरोपींना पकडुन मुद्देमाल हस्तगत करीत फिर्यादीच्या स्वाधीन केला.
रामटेक पोलीस स्टेशन येथुन प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी पुनम ही आपल्या मुलासह रामटेक बसस्थानक येथे आली होती. दरम्यान आरोपी प्रिया शेंडे, वातोबाई पांडे, बायना पात्रे व आशु पात्रे सर्व राहाणार नागपुर या चारही आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या मुलाच्या खिशातुन एक मोबाईल व फिर्यादिच्या पर्समधुन सोन्या, चांदी चे दागीने व काही नगद मिळुन एकुण ३९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून पसार झाले होते.
दरम्यान फिर्यादीच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी कलम ३७९, ३४ भादंवी नुसार गुन्हा नोंदवुन तपास चक्रे फिरविली असता चारही आरोपी मिळुन आले. त्यांच्या जवळुन मुद्दे माल हस्तगत करून पोलीस अधिक्षक मगर यांचे हस्ते फिर्यादीला सोपविण्यात आला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कार्तीक सोनटक्के यांनी केली.