Tuesday, October 15, 2024
Homeमनोरंजनहिमाचल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये ‘द रॅबिट हाऊस’ ने उमटवली मोहर ठरला उत्कृष्ठ...

हिमाचल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये ‘द रॅबिट हाऊस’ ने उमटवली मोहर ठरला उत्कृष्ठ चित्रपट…

करिश्मा ठरली उत्कृष्ठ अभिनेत्री, तर गगन प्रदीप उत्कृष्ठ सहाय्यक अभिनेता.

गणेश तळेकर

गीताई प्रोडक्शन्सची पहिलीच निर्मिती असलेल्या वैभव कुलकर्णी लिखित, दिग्दर्शित हिंदी चित्रपट ‘द रॅबिट हाऊस’ ला आधीच हिमाचल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून सन्मान मिळाला होता. शेवटच्या दिवशी पुरस्कार जाहीर झाले तेव्हा ‘द रॅबिट हाऊस’ ला उत्कृष्ठ चित्रपट पुरस्कार मिळाला, अभिनेत्री करिश्मा हिला उत्कृष्ठ अभिनेत्री पुरस्कार मिळाला, तर अभिनेते गगन प्रदीप यांना उत्कृष्ठ सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला.

हे पुरस्कार हिमाचल प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव ओंकार शर्मा, बॉलिवूड कलाकार संजय मिश्रा, अखिलेंद्र मिश्रा, सत्यपाल शर्मा, सपना संद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्कार दिग्दर्शक वैभव कुलकर्णी, निर्माते कृष्णा पांढरे, सुनीता पांढरे, कलाकार करिश्मा, पूर्वा, गगन प्रदीप, मोतीराम कटवाल यांनी स्वीकारले. यावेळी बॉलिवूड कलाकार पिहू संद, संजय जैस, तेलगू अभिनेता आणि दिग्दर्शक आदित्य ओम आदी मान्यवर उपस्थित होते, तर टीम ‘द रॅबिट हाऊस’ कडून सुनीता सिंग, प्रीती शर्मा, बिकीभाई ठाकूर, निमी ठाकूर, मोहित ठाकूर, मोतीराम कटवाल, देहरुराम कटवाल, हिना कटवाल, आशिष पावगी हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना अखिलेंद्र मिश्रा म्हणाले, ‘द रॅबिट हाऊस सारखा सिनेमा, सध्या ज्या पठडीतले सिनेमे येत आहेत त्यांना छेद देतो. याला खरा सिनेमा म्हणतात. ज्याच्यामध्ये साहित्यिक मूल्ये आहेत आणि तो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.’ तेलगू अभिनेते आणि दिग्दर्शक आदित्य ओम म्हणाले, ‘हा सिनेमा म्हणजे मास्टर पीस आहे. मला हा तेलगूमध्ये करायची इच्छा आहे.’
हा महोत्सव हिमाचल प्रदेशची सांस्कृतिक राजधानी मंडी अर्थात छोटी काशी येथील संस्कृती सदनच्या भव्य दालनात पार पडला.

महोत्सवाच्या सांगता समारंभात, परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यात ‘द रॅबिट हाऊस’ च्या नावाने एक देवदार वृक्ष लावण्यात आला, जो पुढची अनेक वर्षे चित्रपटाची आठवण करुन देत राहिल. महोत्सवाची सुरुवात विलोभनीय मंडवी लोकनृत्य करुन स्त्रियांच्या समूहाने केली, तर सांगता समारंभात उत्तरेकडील लोकनृत्यांनी बहार आणला.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: