सांगली – ज्योती मोरे
मानसिक ताण घालवण्यासाठी खेळ हे सगळ्यात चांगले माध्यम असून खेळामधून शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक आरोग्य ही जपले जाऊन, त्यातून सांघिक भावना वाढीला लागते. अशी भावना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजेय राजंदेकर यांनी व्यक्त केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून 36व्या सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन पोलीस मुख्यालयात करण्यात आले होते. त्या स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
दरम्यान या स्पर्धेत सांगली, मिरज, तासगाव, विटा, इस्लामपूर आणि मुख्यालय अशा सात विभागातील महिला आणि पुरुष मिळून 200 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पोलीस नाईक अविनाश लाड तर सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून पोलीस शिपाई सीमा यादव यांनी बहुमान मिळवला तर सर्वसाधारण पुरुष विजेतेपदाचा मान पोलीस मुख्यालयाने तर सर्वसाधारण महिला विजेतेपदाचा मानही मुख्यालयाने मिळवला आहे.
स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंसह संघांचा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजेय राजंदेकर, जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग एक आर. के. मलाबादी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.
दरम्यान यावेळी पुढील वर्षीच्या स्पर्धा घेण्याचा बहुमान राखीव पोलीस निरीक्षक पांडुरंग सूर्यवंशी पोलीस मुख्यालय यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सदर कार्यक्रमास सांगली उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, मिरज उपविगीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली शेंडगे, जत उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे,
तसेच सर्वच पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, राखीव पोलीस निरीक्षक पांडुरंग सूर्यवंशी, राखीव पोलीस उपनिरीक्षक मनीलाल पवार, विजय पानपाटील, स्पोर्ट्स इन्चार्ज स्वप्निल सावंत, रवी कांबळे, विवेक साळुंखे, रवींद्र पाटील, अभिजीत फडतरे, राकेश पांढरे, पंच तसेच खेळाडू आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.