- सर्व आरोपी उत्तरप्रदेश येथील रहिवाशी.
- प्रवाशांनो चोरट्यांच्या पासून सावधान.
- जलालखेडा येथे चोरी करणारी टोळी जेरबंद.
- महिला प्रवाशांच्या सोने व रोख रक्कम केली लंपास.
- 45 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त.
नरखेड – अतुल दंढारे
उन्हाळा लागताच चोरीचे प्रमाण वाढले. वाहनात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे आपला चोरीचा डाव साधत असतात. असा प्रकार जलालखेडा येथील बस स्थानक परिसरात खासगी ट्रॅव्हल्स मध्ये घडला परंतु चोरट्यांचा डाव फसला.
गुरवारी सकाळी 10 च्या सुमारास वरूड ते नागपूर जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये जलालखेडा येथे चोरट्यांना चोरी करताना प्रवाशांनी पकडले. नयना शेखर मोगरे रा. वरूड, जि. अमरावती ही महिला प्रवाशी वरूड वरून नागपूर जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करत होती. तिच्या जवळ ट्रॉलीबॅग होती त्या बॅगला कुलूप लागले होते.
चोरट्यांनी ते कुलूप तोडून बॅग मधील सोने व पैसे काढले ते गाडी मध्ये असलेल्या एका प्रवाशाला दिसले असता त्या प्रवाशाने आरडा ओरड केली असता गाडीतील प्रवाशांनी त्या चोरट्यांना पकडले व जलाल खेडा येथे गाडी थांबवली असता आजू बाजूला असलेले नागरिक सुध्दा तिथे आले व त्यांनी चोरट्यांना चांगले झोडपले त्यातील दोन चोरटे पळाले असता गावातील काही तरुणांनी त्या चोरट्यांचा पाठलाग करत चोरट्यांना पकडले.
लगेच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. लगेच पोलिस उपनिरीक्षक अनिल जोशी, पोलिस अमलदार पुरुषोत्तम धोंडे, नीलेश खरडे, आशिष हिरूडकर घटनास्थळी पोहचले व त्यांनी चोरट्यांना ताब्यात घेतले. बॅगमध्ये पाच ग्रॅमची सोन्याचे पोत किंमत 30 हजार रुपये, दोन ग्रॅमची सोन्याची पोत किंमत 12 हजार रुपये व रोख 3 हजार 100 रुपये असा एकूण 45 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला.
पोलिसांनी चोरट्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला असून त्यांच्या विरुद्ध कलम 379, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी बासी जम्मा शेख वय वर्ष 40, सानू फुल हसन शेख वय वर्ष 25, नवीन खलील अली वय वर्ष 23, शहादत अली रईस अली वय वर्ष 30, सुभान मोहम्मद हुसेन वय वर्ष 25, जुल्फीकार अब्दुल अजीज वय वर्ष 40 सर्व रा. उत्तरप्रदेश याना अटक केली असून त्यांच्याकडून.
पोलिसांनी 45 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरट्यांना नरखेड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 26 फेब्रुवारी पर्यंत पोलिस रिमांड मध्ये ठेवले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चेतनसिंग चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल जोशी करीत आहे.
गावातील तरुणाची सर्वत्र चर्चा.
खासगी ट्रॅव्हल्स मध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांना जलालखेडा बस स्थानक परिसरात पकडण्यात आले असता त्यातील 2 चोरटे पाळले होते परंतु गावातील गोलू मिर्झा व त्याच्या 4 मित्रांनी त्या चोरट्यांचा पाठलाग करून प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ त्या दोन्ही चोरांना पकडले. गावातील तरुणांनी केलेल्या कामगिरीची सर्वत्र चर्चा होत असून या सर्व तरुणांचा सत्कार करण्यात येणार आहे