Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayभाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांचा खड्डा...दानवे यांनी व्हिडीओ ट्वीट...

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांचा खड्डा…दानवे यांनी व्हिडीओ ट्वीट करत लगावला खोचक टोला…

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा काल महाराष्ट्र दौर्यावर होते त्यांची चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये सभा पार पडली. पण, औरंगाबादच्या सभेत जे.पी.नड्डा यांचं भाषण सुरु होण्यापूर्वीच महिला सभेतून उठून गेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या सभेतील दोन व्हिडिओ ट्वीट करीत भाजपाला टोला लगावला आहे. सोबतच जे.पी. नड्डा यांनी आपल्या भाषणात बोलताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख बाळासाहेब देवरस असा केल्याने शिवसेनेत संतापाची लाट निर्माण झाली आहे.

काल औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कतिक मंडळाच्या मैदानावर जे.पी.नड्डा यांची सभा पार पडली. या सभेत केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचं भाषण सुरु असताता महिला उठून गेल्या. हाच व्हिडीओ अंबादास दानवे यांनी ट्वीट करत भाजपाला लक्ष्य केलं आहे. “अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पाहा हा खड्डा.. लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे,” असं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.

तसेच, जे.पी. नड्डा यांनी भाषणात बोलताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख बाळासाहेब देवरस असा केला. यावरूनही अंबादास दानवेंनी टीका केली आहे. ट्वीट करत दानवे म्हणाले, “नड्डाजी, यापुढे महाराष्ट्रात येताना ‘बाळासाहेब ठाकरे’ हे नाव पाठ करून या. आज सभेत आपण त्यांचा ‘बाळासाहेब देवरस’ असा उल्लेख केला. जे बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख धड करू शकत नाहीत, ते त्यांच्या धगधगत्या विचारांचा वारसा काय सांभाळणार!,” असं अंबादास दानवेंनी सांगितलं.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: