सोशल मीडियावर अनेक सुंदर पोस्ट फिरत असतात, काही प्रेरणा देणार्याही असतात लोक त्यांच्या मनातील शब्दही जगापर्यंत पोहोचवतात. ज्याबद्दल जाणून घेतल्यावर लोकांचे डोळे ओलावतात. असाच एक किस्सा इटलीचा प्रसिद्ध फोटोग्राफर डारियो मिडिएरीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ही कथा त्या मुलीची आहे, जिला फोटोग्राफरने 1992 मध्ये आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते. आता ती मुलगी मोठी झाली आहे आणि तिने छायाचित्रकाराला अशा प्रकारे मदत केली आहे की, त्या मुलीचा (सविता) जुना आणि अलीकडील फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून त्याने तिच्या बद्दल मनातील बोलला, वाचून लोकांचे मन हेलावून जाणार.
छायाचित्रकार डारियो मिडिडीरी (@dariomitidieri) यांनी हा फोटो १६ मार्च रोजी या मथळ्यासह पोस्ट केला: ..त्यामुळे काही सुंदर गोष्टी घडल्या. आजकाल माझी मुलगी मारा आशियाच्या सहलीवर आहे. सविता तिचे मुंबईत स्वागत करते. तीच सविता, जिचा फोटो मी १९९२ साली माझ्या ‘स्ट्रीट चिल्ड्रेन ऑफ बॉम्बे’ प्रकल्पासाठी काढला होता. आता माराला पाहून सविता इतकी खुश झाली की तिला कुठेही जाऊ दिले नाही. मी हे लिहित असताना ते एकत्र जेवत आहेत. त्यांच्या सोबत महिंद्रा शिंदे हा माझा जुना मित्र आहे. माझ्या प्रकल्पाच्या यशात त्यांचा विशेष वाटा आहे.
त्यांनी पुढे लिहिले – सविता अजूनही अतिशय सामान्य जीवन जगत आहे. ती पर्यटकांना केसांच्या क्लिप विकते. तिचे जीवन कठीण आहे. तरीही त्यांनी माझ्या मुलीला मुंबई फिरायला जाण्यासाठी म्हणून तीन दिवस काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यावरून असे दिसून येते की सर्वात गरीब लोकांचे हृदय सर्वात मोठे असते. होय, मी माझ्या प्रवासात ही गोष्ट अनेकदा पाहिली आहे. म्हणूनच मला सविता, महिंद्र आणि इतर अनेक अद्भुत लोक आवडतात. आणि म्हणूनच भारत माझ्या रक्तात आहे. अनेकांनी याला हृदयस्पर्शी म्हटले आहे, तर काहींनी तुम्ही उत्तम छायाचित्रकार असल्याचे लिहिले आहे.