Monday, December 23, 2024
Homeराज्यगोंदिया | दुसऱ्यांसाठी जगनारे व्यक्तिमत्व म्हणजे स्व. मनोहरभाई पटेल : राजेश कटरे…

गोंदिया | दुसऱ्यांसाठी जगनारे व्यक्तिमत्व म्हणजे स्व. मनोहरभाई पटेल : राजेश कटरे…

स्व. मनोहरभाई पटेल यांची 118 वी जयंती राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष जनसंपर्क कार्यालय एकोडी येथे साजरी…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात व्यवसायाच्या निमित्ताने आलेले अल्पशिक्षित बाबुजी स्व. मनोहरभाई पटेल यांची 118 वी जयंती राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष जनसंपर्क कार्यालय एकोडी येथे राजेश कटरे यांच्या अध्यक्षते खाली व जगदिश (बालु) बावनथड़े जिल्हा परिषद सदस्य यांच्या उपस्थितीत 118 वी जयंती साजरी करण्यात आली.

स्व. मनोहरभाई पटेल यांनी गोंदिया शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आदिवासीबहुल भागातील जनतेसाठी शिक्षणाची सोय करून दिली. संपूर्ण आयुष्य स्वत:साठी जगण्यापेक्षा दुसऱ्यांसाठी जगणारे स्व. मनोहरभाई पटेल हे ‘मन के मित’ असल्याचे प्रतिपादन राजेश कटरे यांनी या वेळी केले.

स्व. मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ते जनसंपर्क कार्यालय एकोडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुरुषोत्तम भदाडे ग्राम पंचायत सदस्य, नामदेव बेहार, पिरमलाल बरियेकर, आरिफ़ पठान पत्रकार, धर्मेन्द्र कनोजे, भरत परिहार, मोनु पठाण, बंटी रिणायत, बालु भदाडे, विशाल कनोजे, उमेश राउत, सुनिल पटले, पुरनलाल बिसेन, महेंद्र लांजेवार, दिपक रोकडे, नितेश डुंडे ,बाला बिरणवार व परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्ये उपस्थित होते.

स्व. मनोहरभाई पटेल यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी जात, धर्म, पंथ, गरीब, श्रीमंत असा भेद न करता सर्वसामान्यांसाठी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य केले. त्यांचे कार्य पुढे नेण्याचा वारसा खासदार प्रफुलभाई पटेल चालवित आहे. नवीन पिढीला अशा उपक्रमातून स्व. मनोहरभाई पटेल यांच्या कार्याची जाणीव होते, ही अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे असे ही राजेश कटरे यांनी या वेळी केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: