Sunday, December 22, 2024
Homeखेळतणाव मुक्त राहण्याचे योग्य ठिकाण म्हणजे, मैदानी खेळ…ठाणेदार विजयजी चव्हाण...

तणाव मुक्त राहण्याचे योग्य ठिकाण म्हणजे, मैदानी खेळ…ठाणेदार विजयजी चव्हाण…

दानापूर – गोपाल विरघट

दानापूर येथील चंद्रशेखर आझाद मंडळ यांच्या वतीने व्हाॅलीबाॅल चषक सामन्याचे आयोजन 25 व26 फेब्रुवारी शनिवार, रविवार रोजी करण्यात आले होते. या सामन्याचे उदघाटक विजयजी चव्हाण ठाणेदार हिवरखेड, अध्यक्ष डॉ.अजेय विखे व प्रमुख उपस्थिती सागर ढगे उपसरपंच, राजीव उंबरकार, अध्यक्ष तंटामुक्ती, संदीप बारिंगे पी एस आय यवतमाळ , संतोष माकोडे पोलिस पाटील, डॉ. वासुदेव शर्मा, डॉ.आशिष हागे, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव खवले, योगेश येऊल, गोपाल माकोडे, विपुल कुऱ्हाडे,प्रमोद ढाकरे, पत्रकार केशव कोरडे, संजय हागे, गोपाल विरघट,समाधान हागे, यांची उपस्थिती होती.

सर्व प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष,उदघाटक प्रमुख उपस्थितीत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सामान्यचे फित कापुन उदघाटन करण्यात आले, यावेळी ठाणेदार चव्हाण यांनी बोलतांना ताणतणाव मुक्त राहण्याचे ठिकाण म्हणजे मैदानी खेळ विद्यार्थी वर्गाने सतत अभ्यास करत असतांनाच काही वेळ मैदानी खेळ खेळण्याचा आनंद घ्यावा ज्यामुळे आपल्यावर आलेला ताणतणाव कमी होते,

व याच खेळातुन आपण जिल्हा राज्य आदी स्तरापर्यंत मजल गाठू शकतो मैदानी खेळ हे ग्रामीण भागातीलच खेळ आहेत ते शहरी भागात नावलौकिक करू शकता तिथे सर्व सोयी सुविधा उपलब्ध असतात, परंतु आपण ग्रामीण भागातील खेळाडुनी सुध्दा सर्वस्वी प्रयत्न करुन खेळांमध्ये सहभागी व्हावे शिक्षण घेत असताना एक तास तरी मैदानी खेळ खेळले पाहिजेत ज्यामुळे आपण तणाव मुक्त राहु शकतो असे उदघाटक म्हणून बोलत होते.या सामान्यात प्रथम पारितोषिक 15001 रामप्रभु तराळे,

तेल्हारा यांचे कडुन, द्वितीय पारितोषिक 7001 रविकुमार घुंघड,हिवरखेड, तृतीय पारितोषिक 5000 सरपंच सपनाताई धम्मपाल वाकोडे,व उपसरपंच सागर ढगे दानापूर यांचे कडुन,चवथे पारितोषिक 3001 विनोद विरघट राज्यकर अधिकारी मुंबई यांचे कडुन,पाचवे पारितोषिक 2001 गजेंद्र राठी यांचे कडुन ,बेस्ट सेंटर 701,व बेस्ट नेटर 701 डॉ.आशिष हागे यांच्या कडुन, प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या टिम करिता शिल्ड अजिंक्य ढाकरे यांचे कडुन देण्यात आले विजयी संघ.

प्रथम क्रमांक सवळद व्हाॅलीबाॅल संघ, द्वितीय क्रमांक मनसगाव .संघ , तृतीय क्रमांक सातेगाव संघ, चतुर्थ क्रमांक चंद्रशेखर आझाद संघ दानापूर तर पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक अकोला संघ यांनी पटकाविले यावळी रामप्रभु तराळे राष्ट्रवादी काँग्रेस, गोपाल माकोडे ग्रा.पं.सदस्य, विपुल कुऱ्हाडे, गजेंद्र राठी यांचे हस्ते सामन्यातील विजयी चमुना बक्षीस वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय हागे यांनी केले.सामना यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर आझाद मंडळ महादेव टापरे, विजय बिसेन, गणेश घायल,शाम घायल,रूपेश कुऱ्हाडे, पवन राऊत,मोहन तायडे,अंकुश प्रभे,विकी ढाकरे, आदी सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: