Sunday, November 17, 2024
Homeसामाजिकमूर्तिजापूरकरांनी दिला माणुसकीचा परिचय...रेल्वे प्रवाश्यांच्या संकटकाळी मदतीला आले आमदार धावून…

मूर्तिजापूरकरांनी दिला माणुसकीचा परिचय…रेल्वे प्रवाश्यांच्या संकटकाळी मदतीला आले आमदार धावून…

नरेंद् खवले, मूर्तिजापूर

काल झालेल्या मुसळधार पावसाने मूर्तिजापूर तालुक्यात कहरच केला, येथूनच जवळच असलेल्या माना गावाजवळील रेल्वे मार्गावरील रुळाखालील पावसाने गिट्टीसह मातीचा भराव वाहून गेल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. दोन्ही कडील गाडया रद्द करण्यात आल्यात, तर अनेक भुसावळ मार्गे वळविण्यात आल्यात, अश्यातच मूर्तिजापूर रेल्वस्थानकावरील प्रवाश्यांची तारांबळ उडाली होती, त्यांच्यापुढे येथून पुढे जायचे कसे असे संकट थाटले असताना मुर्तिजापूर चे आमदार हरिष पिंपळे मदतीला धावून आले.

मूर्तिजापूर रेलवे स्थानकावर थांबविण्यात आलेली अहमदाबाद एक्स्प्रेस व भुसावळ वर्धा गाडीने आलेल्या प्रवाश्यांना दिलासा देण्याचे काम मूर्तिजापूर चे आमदार हरीश पिंपळे व त्यांचे सहकारी यांनी केले. सोबतच बरेच मुर्तिजापूरकरांनी आपल्या माणुसकीचा परिचय देत असंख्य लोकांना पाणी व चहाची व्यवस्था केली.

अडकलेल्या प्रवाश्यांना आपल्या निश्चित स्थळी पोहचण्यासाठी आमदार हरिषभाऊ यांनी स्वतः हजर राहून बसची व तसेच गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. यावेळी अडकलेल्या प्रवाश्यांना नास्ता,चहा,बिस्किट तसेच पाणी बॉटल सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे असंख्य प्रवाश्यांनी त्यांचे आभार मानले…यावेळी बस डेपोचे मॅनेजर हेमंत चांदुरकर, अनिल मानके, संतोष घोगरे, रवी शर्मा, गणेश सोळंके यांच्यासह राहुल इंगोले यांनीही मदतीचा हात दिला व तसेच रेल्वे स्टेशन चौकातील दुकानदार व तरुणांनी आप आपल्या परीने मदतीचा हात दिला.

नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावरील 12 रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सर्व परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी काम सुरु आहे,

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: