Monday, December 23, 2024
Homeराजकीयजत तालुक्यातील जनता महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच लागेल असा निर्णय घेणार नाही -...

जत तालुक्यातील जनता महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच लागेल असा निर्णय घेणार नाही – खासदार संजय पाटील…

सांगली – ज्योती मोरे

जत तालुक्यातील जनता महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच लागेल असा निर्णय घेणार नाही. असा विश्वास सांगली जिल्ह्याचे खासदार संजय पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.2017 साली जत मधील पूर्व भागातील वीस गावांमधील नागरिकांनी पाण्याची व्यवस्था महाराष्ट्र सरकारने न केल्याने उद्यिग्णे होऊन ग्रामपंचायत मध्ये ठराव करून कर्नाटक राज्यात जाण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आता म्हैसाळ योजनेचे पाणी जत तालुक्यातील अनेक गावापर्यंत पोहोचले असून उर्वरित भागात येत्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हैसाळ विस्तारित योजनेला मान्यता घेऊन ते काम सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान या भागात असणाऱ्या कन्नड शाळांच्या संस्थाचालकांनी आपल्या शाळांना कर्नाटक सरकारकडून अनुदान मिळवण्यासाठी रचलेला हा कुटील डाव असल्याचा आरोप करत, जत तालुक्यातील कुठलेही गाव कर्नाटकात जाण्यासाठी तयार नाही .आम्ही त्यांना सोडणारही नाही . अशी प्रतिक्रिया खासदार संजय पाटील यांनी पुढे बोलताना व्यक्त केली आहे.
ज्यावेळी जत तालुक्यातील वीस गावातील ग्रामपंचायतींनी हा ठराव केला होता, तेव्हा म्हैसाळ योजनेची पूर्तता झालेली नव्हती.

त्यानंतर बंदिस्त पाईपलाईन द्वारे पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेतून 2100 कोटी रुपये निधी आणून ते काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल चालू होती,परंतु कोरोनामुळे ही योजना थोडी पुढे गेली होती. या योजनेची कामे आता संपली असून या योजनेतून जत तालुक्यातील काहीच गावांना पाणी मिळाले,परंतु इतर गावांसाठी 2019 साली म्हैसाळ विस्तार योजना आणली गेली.

ती योजना येत्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंजूर करून कामास सुरुवात करून तालुक्यातील मल्याळ गावात हे पाणी सोडून दुसऱ्या टप्प्याद्वारे हे पाणी उचलून उर्वरित गावांना पुरवले जाणार असल्याचेही खासदार संजय पाटील यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: