पातूर – निशांत गवई
30/06/2019 रोजी पातुर तालुक्यातील चारमोळी येथील रहिवासी असलेली फिर्यादी ही तिचे वडिलांच्या बकऱ्या चारण्यासाठी घेऊन गेली असता फिर्यादीचा पाठलाग करून आरोपी देविदास कांशीराम खुळे राहणार चारमोळी ता. पातूर याने तिचा जबरीने दुखापत होईल असा हाथ धरून विनयभंग केला अश्या आशयाची तक्रार तिने चांन्नी पोलीस स्टेशन ला दिल्यावरून कलम 354, 323 भा. द.वी. गुन्हा नोंदवून सखोल तपास करण्यात आला व नंतर पातूर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले…
सदरचे प्रकरणात अभियोग पक्ष्याने एकूण 4 साक्षिदार तपासले व सबळ साक्ष पुरावे असल्याने पातूर 1 ले न्यायदंडाधिकारी श्री. कैलास कुरंदले साहेब यांनी आज दिनांक 30/05/24 रोजी आरोपीला कलम 354 व 323 अंतर्गत दोषीं ठरवले आहे… आरोपीला कलम 354 अंतर्गत 1 वर्ष सश्रम कारावास व 2000 रु. दंड आणि दंड न भरल्यास 1 महिना सश्रम करावास तसेच कलम 323 अंतर्गत 6 महिने सश्रम कारावास आणि दंड न भरल्यास आणखी 10 दिवस सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे….
सरकार पक्षाची बाजू विशेष सह्यायक सरकारी अधिवक्ता श्री हृषीकेश जुनारे यांनी भक्कम पणे मांडली, प्रकरणाचा पोलीस तपास अधिकारी श्री. पद्माकर पातोंड केला तर पैरावी अधिकारी म्हणूंन श्री. राजेश चव्हाण यांनी कामकाज पाहिले आरोपोचे वकील म्हणून Adv उमेश महल्ले यांनी बाजू मांडली.