सांगली – ज्योती मोरे
मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील संजय जुजारे. वय वर्षे 44, हे हृदयरोग तज्ञ डॉ.रियाज मुजावर यांच्याकडे छातीत दुखल्याने दाखवण्यास गेले असता,त्यांच्या सर्व टेस्ट करण्यात आल्या.
त्या टेस्ट नॉर्मल आल्या. रक्ताच्या नमुनेच्या रिपोर्ट मात्र येण्याचे बाकी असल्याने सदर पेशंट रिपोर्टची वाट पाहत ओपीडी मध्ये बसले असताना अचानकपणे कोसळले त्यांना ताबडतोब CPR देत सिनर्जी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.याठिकाणी त्यांच्यावर ताबडतोब अँजिओप्लास्टी करून सदर पेशंटचे प्राण वाचवण्याचे काम डॉ.रियाज मुजावर यांनी केले.
त्यांना मृत्यूच्या दारातून माघारी आणण्याचं काम डॉक्टर मुजावर यांनी केल्याने, सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे. दरम्यान कोणत्याही व्यक्तीस हार्ट अटॅक आल्यास प्रथम त्याच्या नाडीचे ठोके तपासून नंतर त्यास हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होईपर्यंत CPR दिल्यास पेशंटचे प्राण वाचू शकतात.
त्यामुळे CPR हा प्राण वाचवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो, असं मनोगत डॉ. रियाज मुजावर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले तर सदर पेशंटचे प्राण केवळ डॉ. मुजावर यांच्यामुळेच वाचले असल्याची प्रतिक्रिया सिनर्जी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. रवींद्र आरळी यांनी व्यक्त केले.