चित्रपट क्षेत्रात अनेकवेळा स्वतःला मोठे दाखवून दिग्दर्शकांना गंडवितात, तर अश्या लोकांना बरेच जण बळी सुद्धा पडतात, अशीच घटना मराठी चित्रपट दिग्दर्शक ज्ञानेश्वर उमक यांसोबत घडली, त्यांना हैद्राबाद येथील एका कंपनीच्या मालकाने गंडा घातल्याचा प्रकार घडून आलाय. ही सौल मीडिया नावाची कंपनी असून या कंपनीचा मालक विजय यार्रलागड्डा आहे.
विजय यार्रलागड्डा या व्यक्तीने दिग्दर्शक ज्ञानेश्वर उमक यांच्याकडून 2018 साली एक फिल्म घेतली, त्याचे पैसे वारंवार मांगून सुद्धा दिले नाही, प्रत्येक वेळी उडवा उडवी चे उत्तर दिले. तेव्हा त्याने अमेझॉन कंपनी ला लीगल नोटीस पाठवली, अमेझॉन नी सौल मीडिया कंपनी ला बॅकलिस्ट केले,
आता येत्या 5 तारखेला ज्ञानेश्वर उमक हैद्राबाद जाऊन स्वतः पोलीसात तक्रार करणार असल्याचे सांगितले. तर याच बरोबर ज्ञानेश्वर यांनी सर्वाना आवाहन केले की, जर अजून कुणाची फसवणूक झाली असेल त्यांनी ज्ञानेश्वर यांच्याशी संपर्क साधावा…असे आवाहन दिग्दर्शक ज्ञानेश्वर उमक यांनी केले आहे.