मौदा पोलिसांत गुन्हा दाखल आरोपी ची कारागृहात रवानगी
राजु कापसे
नागपूर : म.रा.वि.वि.कं. मर्या. मौदा उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या वडोदा (ता.कामठी) विज वितरण केंद्रावर तंत्रज्ञ (बाह्यस्रोत) म्हणुन कत्रांटी पदावर २०१९ पासून कार्यरत असलेल्या अतुल दिलीप वानखेडे (वय २९ वर्षे रा. भामेवाडा पोस्ट- माळणी ता. कुही) यांच्या कार्यक्षेत्रात चिकना, रान मांगली, बोरगाव, जाखेगाव ईत्यादी गावे येत असुन सदर गावातील विद्युत लाईनची देखभाल करणे तसेच थकबाकीदार ग्राहकांची विद्युत बिलांची वसुली करणे ईत्यादी कामकाज करावी लागतात.
गुरुवार दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास अतुल वानखेडे हे नेहमीप्रमाणे विद्युत वितरण केंद्र, वडोदा येथील कार्यालयात गेले अतुल व त्यांच्या सोबत कंत्राटी लेबर आकाश चाचेरकर (रा. नांन्हा मांगली) हे दोघेही अतुल च्या होंडा ड्रिम युगा दुचाकीने विद्युत लाईनच्या देखभालकामी व थकबाकीदार ग्राहंकाच्या वसुली करिता निघाले. सर्वप्रथम जाखेगाव, बोरगांव येथे जावुन त्यानंतर रान मांगली दुपारी १.३० वा चे सुमारास चिकना येथे गेले. गावातील विद्युत पुरवठा बंद करुन गावातील थकबाकीदार पुरुशोत्तम, कवडु बचाले यांचे विद्युत बिल थकले असल्याने व ते भरणा करित नसल्याने वरिष्ठांचे आदेशानुसार त्यांचा विज पुरवठा खंडीत केला. त्यांनतर केवळ तुळशीराम गजभिये यांच्यावर विज बिल रक्कम १०३२९ रु. चा भरणा केला नसल्याने तसेच त्यांना वांरवार सांगून सुद्धा त्यांनी भरणा केला नसल्याने त्यांचे घरी गेले तेव्हा त्यांचा मुलगा दिनेश गजभिये होता त्यास बिल भरना केला नसल्याने आपला विद्युत पुरवठा खंडीत करून खंडित केल्याचे सांगितले, त्यावर त्याने मी माझा भाऊ गणेश ला कळवितो असे म्हणाला गणेश याने यापुर्वीही विद्युत बिल भरणाबाबत अतुल वानखेडे सोबत वाद विवाद केला होता.
त्यानंतर गावातील विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करून वडोदा च्या दिशेने दोघेही निघाले दुपारी दोन वाजताच्या दरम्यान बोरगाव येथील प्राथमिक शाळेजवळ गणेश केवळ गजभिये (वय. 34 वर्षे रा. चिकना) हा त्याची पांढऱ्या रंगाची टवेरा गाडी घेवुन उभा होता. जवळ जाताच त्याने थांबवुन गाडीतील लाकडी बल्ली ने मारहाण करून अश्लील शिवीगाळ करून लाईन कशी बंद केलास, तुला पाहून घेईन अशी धमकी दिली व मोबाईल हिसकला, टी शर्ट फाडला. सोबत असलेला आकाश घाबरून बाजूला उभा होता. कशीबशी सुटका करून तेथून निघाले काही अंतरावर गेल्यावर बोरगाव येथिल युवक हिमांशु शेंडे भेटला व त्यांच्या मोबाईल वरून कनिष्ठ अभियंता दर्शन गभणे यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहीती दिली. व मौदा पोलीस स्टेशन ला येऊन तक्रार केली.
मौदा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (वीएनएस) २०२३ नुसार १२१(१), १३२, ३५१(२) गुन्हा दाखल करून आरोपी ला मौदा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक देवरे व प्रदिप खिल्लारे करित आहेत.