Monday, November 18, 2024
Homeराजकीयदुसऱ्याचे वस्त्रहरण करनाऱ्याचेच आज वस्त्रहरण झाले :- नाना पटोले...

दुसऱ्याचे वस्त्रहरण करनाऱ्याचेच आज वस्त्रहरण झाले :- नाना पटोले…

सीबीआय, ईडीची भिती दाखवून लोकांना ब्लॅकमेल करण्याचे भाजपाचे षडयंत्र.

शिक्षकांची रिक्त पदे न भरता निवृत्त शिक्षकांना मानधनावर घेण्याचा जीआर अन्यायकारक.

मुंबई – भाजपाने मागील ९ वर्षात महाराष्ट्राला कलंक लावण्याचे पाप केले आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा जो आक्षेपार्ह व्हिडिओ एका खाजगी वृत्तवाहिनीने दाखवलेला आहे, तो बघितल्यानंतरच या विषयावर जास्त बोलणे योग्य होईल.

परंतु दुसऱ्याचे वस्त्रहरण करनाऱ्याचेच आज वस्त्रहरण झाले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. किरीट सोमय्या यांच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, २०१४ पासून राज्यात सीबीआय, ईडी. आयकर विभाग यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची भिती दाखवून ब्लॅकमेल करण्याचे वातावरण सुरु आहे.

भाजपाने, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा? असा परिस्थिती झाली आहे. जी व्यक्ती दुसऱ्यांचे वस्त्रहरण करत होती त्याच व्यक्तीचे आता वस्त्रहरण झालेले आहे. या मुद्दा काँग्रेस पक्षासाठी महत्वाचा नाही तर काँग्रेससाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. महागाई, शेतकरी, महिला, कायदा सुव्यवस्था, तरुणांचे प्रश्न आहेत.

महागाई गगनाला भिडली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, सरकार विधानसभेत घोषणा करते पण मदत मात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही, हे प्रश्न मार्गी लावण्याचे काम काँग्रेस पक्षासाठी महत्वाचे आहे. बेरोजगारीचा प्रश्न मोठा गंभीर आहे, सरकारी नोकर भरती करण्यात राज्य सरकार टाळाटाळ करत आहे.

राज्यात ५० ते ६० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत परंतु ती भरली जात नाहीत आणि निवृत्त शिक्षकांना मानधनावर घेण्याचा अफलातून शासन आदेश जारी केलेला आहे.

हा शासन आदेश शिक्षक होऊ पाहणाऱ्या तरुण-तरुणींचा घोर अपमान करणारा आहे. या शासन आदेशाविरोधात पुण्यात बेरोजगार तरुण आंदोलनही करत आहेत. सरकारने या प्रश्नात लक्ष घालून तरुणांना न्याय दिला पाहिजे असेही पटोले म्हणाले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: